वेढुनी आवेग माझा रोज गाभुळतेस तू
वेढुनी आवेग माझा रोज गाभुळतेस तू
पण तुला ओलावतो तेव्हा मनी नसतेस तू
मी मला का आवडावे ही समस्या संपली
की तुला सांगेन मी की खूप आवडतेस तू
शोधतो माझ्या खुणा विझत्या निखार्यातून मी
जाळुनी हासून निमिषार्धात ओसरतेस तू
दर्शनासाठी असभ्यासारखा खोळंबतो
आणि सभ्यासारखी पडद्यातुनी बघतेस तू
चांगले काहीच नाही आपल्या दोघांमधे
एवढे जर सोडले की चांगली दिसतेस तू
मीलनाची रात सारी कोरडी जाऊनही
नीट वागवतेस दिवसा, हे कसे करतेस तू?
तू तसे केलेस की मी नाकही घासायचे
मी अबोला पाळला की 'बेफिकिर' म्हणतेस तू
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 09/02/2011 - 10:09
Permalink
मी मला का आवडावे ही समस्या
मी मला का आवडावे ही समस्या संपली
की तुला सांगेन मी की खूप आवडतेस तू
दर्शनासाठी असभ्यासारखा खोळंबतो
आणि सभ्यासारखी पडद्यातुनी बघतेस तू
चांगले काहीच नाही आपल्या दोघांमधे
एवढे जर सोडले की चांगली दिसतेस तू
छान. वरील शेर विशेष उल्लेखनीय वाटले.
बहर
बुध, 09/02/2011 - 12:41
Permalink
गाभुळतेस, आवडतेस, बघतेस..
गाभुळतेस, आवडतेस, बघतेस.. सर्वच शेर आवडले.. विशेषतः 'गाभुळतेस' हा शब्दप्रयोग खूप नाविन्यपूर्ण वाटला. वा!
मयुरेश साने
गुरु, 10/02/2011 - 08:10
Permalink
दर्शनासाठी असभ्यासारखा
दर्शनासाठी असभ्यासारखा खोळंबतो
आणि सभ्यासारखी पडद्यातुनी बघतेस तू
क्य बात ...हा तर अफाट शेर आहे....
चांगले काहीच नाही आपल्या दोघांमधे
एवढे जर सोडले की चांगली दिसतेस तू
..अप्रतीम अप्रतीम अप्रतीम
कैलास
गुरु, 10/02/2011 - 09:21
Permalink
कोणता एक शेर कोट करायला नको.
कोणता एक शेर कोट करायला नको. अप्रतिम गझल.
शाम
गुरु, 10/02/2011 - 09:46
Permalink
शेवटचे ३ खूप भावले!!! की तुला
शेवटचे ३ खूप भावले!!!
की तुला सांगेन मी की खूप आवडतेस तू...एकाच ओळीत २ ' की'...लय घालवतात असे वाटते.
ऐवजी 'हे'/'गे'..कसे वाटेल?
मतलाही तितकासा भिडला नाही.
बेफिकीर
मंगळ, 15/02/2011 - 19:14
Permalink
धन्यवाद सर्वांचे! शाम, शेर
धन्यवाद सर्वांचे!
शाम,
शेर पुन्हा तपासतो एकदा!
धन्यवाद!
वैभव वसंतराव कु...
सोम, 07/12/2015 - 05:59
Permalink
मी मला का आवडावे ही समस्या
मी मला का आवडावे ही समस्या संपली की तुला सांगेन मी .....की खूप आवडतेस तू ! असे अर्थासाठी तोडायचे आहे
तरी शमजींची सूचना लक्षात घेण्याजोगी
तर तुला सांगेन मी की ..असा बदल देखील करता येईल पण त्या दोन कींची नादमयता जी मजा देते ती हरवेल असे वाटते
चांगली दिसतेस तू यातही अन्वय लावायचा झाल्यास की ची जागा खूप आधी आणावी लागते हीही एक गम्मत आहे त्या शेराची
तू चांगली दिसतेस एवढे जर सोडले की (/तर) आपल्या दोघात चांगले असे काहीच नाही असा अर्थ लागतो
असो
मीलानाची रात सारी कोरडी जाऊनही हा माझा सर्वात आवडता शेर आज पुन्हा वाचावा वाटला म्हणून गूगलत गूगलत इथे पोचलो
बाळ पाटील
सोम, 07/12/2015 - 11:34
Permalink
सुंदर गझल ............टीपिकल
सुंदर गझल ............टीपिकल बेफिकीरीयन !!