डोळ्यात अडकली स्वप्ने..

डोळ्यात अडकली स्वप्ने.. रक्तात हरवली गाणी..
हा चंद्र पुन्हा पुनवेचा.. ही फिरून तीच विराणी..

हळवासा स्पर्श तुझा तो .. आठवतो आज तनूला..
अलवार बोल अजुनीही.. मांडती तुझी गाऱ्हाणी!

तू गेल्यावर जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने ही अनवाणी!

बागेतच फुलतो आता.. बाजार फुलांचा मोठा..
हा उदिम 'वेगळा' आहे, सोडुन जनरीत पुराणी!

ही पुरे वर्णने आता, ओघळणाऱ्या घावांची..
का कथा-व्यथा सांगावी? जखमांची तीच कहाणी!

-- बहर.

३१/१२/२०१०

गझल: 

प्रतिसाद

खुप चन होति गझल
विशेश दुसर्‍आ स्।अ‍ॅर्‍

मस्त गझल!

हळवासा स्पर्श तुझा तो .. आठवतो आज तनूला..
अलवार बोल अजुनीही.. मांडती तुझी गाऱ्हाणी!

छान!

तू गेल्यावर जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने ही अनवाणी!

छान!

गझल छान झाली आहे.

हा चंद्र पुन्हा पुनवेचा.. ही फिरून तीच विराणी..

ह्या ओळीत फिरुनी (फिरुनी हे रूप आपण बहुधा बोलण्यात वापरत नाही तरी) केल्यास कानांना अधिक सुखद (यूफोनिक) वाटते आहे.

आजकाल एकंदर गझलांत भावगीतीय शब्दकळा (हळवासा, अलवार) येत आहेत असे दिसते आहे. (इथे हळवासा, अलवारची ट्रीटमेंट भावगीतीय वाटली. ते शब्द भावगीतीय आहेत असे नाही.)

धन्यवाद चित्तरंजन.. बेफिकीर.. कुणाल सर्वांचे आभार.

चित्तरंजन.. सुचनांबद्दल अनेक आभार. 'फिरुनी' जास्त छान वाटते आहे असे मलाही वाटले. सुचनांवर नक्की विचार करेन. पुन्हा धन्यवाद. :)

-- बहर.

ही पुरे वर्णने आता, ओघळणाऱ्या घावांची..
का कथा-व्यथा सांगावी? जखमांची तीच कहाणी!

-- बहरजी.. अच्छा है...

धन्यवाद हाडके साहेब... :)

हळवासा स्पर्श तुझा तो .. आठवतो आज तनूला..
अलवार बोल अजुनीही.. मांडती तुझी गाऱ्हाणी!

तू गेल्यावर जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने ही अनवाणी!

हे दोन्ही मस्तच.

धन्यवाद सोनलीजी..

बहरजी, वाह क्या बात है!
तू गेल्यावर जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने ही अनवाणी!

छान, फार छान!

बहरजी, वाह क्या बात है!
तू गेल्यावर जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने ही अनवाणी!

छान, फार छान!

बहरजी
गजल खूपच मस्त आणी हळुवार झाली आहे. सर्वच शेर मनाला स्पर्षून जतात. एक चांगली गजल वाचल्याचा अनंद मिळाला. धन्यवाद