तुझा दोष नाही

तुझ्या पातिव्रत्यास अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही
खरे नेहमी भोगती हीच शिक्षा, तुझा दोष नाही!

तुझ्या सोबतीला कुणीही न येथे, तुझा आसरा तू,
तुझ्या सावलीला तुझी ना प्रतिक्षा, तुझा दोष नाही

तुझा धर्म मानव्य, त्याला नसे आकृतीबंध काही,
नसे ग्रंथ, ना चौकटी की न दीक्षा, तुझा दोष नाही!

तुझ्या मुक्त काव्यातही छंद आहे, खुला बंध आहे
कुणा लेख वाटो, कुणाला समीक्षा, तुझा दोष नाही!

दिली लक्ष्मणाने तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
तुझी संस्कृती सांगते, "घाल भिक्षा", तुझा दोष नाही!

तुझी तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा तूच कैदी,
तुझा तू गुन्हा अन् तुझी तूच शिक्षा, तुझा दोष नाही?

गझल: 

प्रतिसाद

मस्त आहे गझल....

तुझ्या मुक्त काव्यातही छंद आहे, खुला बंध आहे
कुणा लेख वाटो, कुणाला समीक्षा, तुझा दोष नाही!

दिली लक्ष्मणाने तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
तुझी संस्कृती सांगते, "घाल भिक्षा", तुझा दोष नाही!

हे दोन शेर बेहद्द आवडले..

तुमच्याकडून काल ऐकताना आणखी मजा आली..!

संपूर्ण गझल आवडली.....

वास्तववादी !!!

तुझी तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा तूच कैदी,
तुझा तू गुन्हा अन् तुझी तूच शिक्षा, तुझा दोष नाही?

वावाव्वा! उत्तम. फारच आवडला हा शेर आणि एकंदर गझलही छान आहे.

तुझा धर्म मानव्य, त्याला नसे आकृतीबंध काही

ही ओळ व

तुझी तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा तूच कैदी,
तुझा तू गुन्हा अन् तुझी तूच शिक्षा, तुझा दोष नाही

हा शेर सर्वाधिक आवडले.

पातिव्रत्यात या शब्दात एक मात्रा अधिक होते असे माझे मत आहे.

(ति या अक्षराची)

धन्यवाद!

तुझ्या पातिव्रत्यास अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही
खरे नेहमी भोगती हीच शिक्षा, तुझा दोष नाही!
बेफिकिर यांचेशि सहमत

तुझी तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा तूच कैदी,
तुझा तू गुन्हा अन् तुझी तूच शिक्षा, तुझा दोष नाही?
हा शेर फारच आवडला गझलही छानच आहे.

दिली लक्ष्मणाने तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
तुझी संस्कृती सांगते, "घाल भिक्षा", तुझा दोष नाही!
शेर जास्त आवडला