एक पाखरु फांदीवर...

एक पाखरु फांदीवर
फांदी हलते खाली वर

वेल लावली प्रेमाची
धोके फुलले वेलीवर

भांडण होते दिवसाशी
चिडतो आपण रात्रीवर

पृथ्वी नावाचे घरटे
आकाशाच्या फांदीवर

शाप किती बनले त्यांचे
दिलेत तू तर काही वर

त्यांचे बळ, त्यांची उर्जा
सरते भाषणबाजीवर

जगणे भिजले अश्रूंनी
टाकू कुठल्या दोरीवर

चल मिसळू मातीत पुन्हा
खूप थांबलो मातीवर

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

पृथ्वी नावाचे घरटे
आकाशाच्या फांदीवर

मस्त

मार... डाला...!
क्या बात है! तबियत खुश कर दी आपने..
जगणे भिजले अश्रूंनी
टाकू कुठल्या दोरीवर

सुरेख.. सुरेख.. सुरेख !

वेल लावली प्रेमाची
धोके फुलले वेलीवर

भांडण होते दिवसाशी
चिडतो आपण रात्रीवर

जगणे भिजले अश्रूंनी
टाकू कुठल्या दोरीवर

चल मिसळू मातीत पुन्हा
खूप थांबलो मातीवर

हे शेर फार आवडले.
(मतला समजला नाही.)

चांगली सुरेख झाली आहे गझल.

एक पाखरु फांदीवर
फांदी हलते खाली वर

वेल लावली प्रेमाची
धोके फुलले वेलीवर


भांडण होते दिवसाशी
चिडतो आपण रात्रीवर

चल मिसळू मातीत पुन्हा
खूप थांबलो मातीवर

वाव्वा.

खालील सर्व शेर आवडलेच!

एक पाखरु फांदीवर
फांदी हलते खाली वर

वेल लावली प्रेमाची
धोके फुलले वेलीवर

भांडण होते दिवसाशी
चिडतो आपण रात्रीवर

पृथ्वी नावाचे घरटे
आकाशाच्या फांदीवर

जगणे भिजले अश्रूंनी
टाकू कुठल्या दोरीवर

चल मिसळू मातीत पुन्हा
खूप थांबलो मातीवर

या गझलेतील मतल्याबाबत: - खाली व वर हे दोन शब्द वेगळे लिहिल्यामुळे मनात आले. वेगळे लिहिल्यास ते काफिया व रदीफ होतील ना? की एकत्र लिहून ते टाळता येईल?

धन्यवाद!

सर्वांचे मनापासून आभार

>या गझलेतील मतल्याबाबत: - खाली व वर हे दोन शब्द वेगळे लिहिल्यामुळे मनात आले. वेगळे लिहिल्यास ते काफिया व रदीफ होतील ना? की एकत्र लिहून ते टाळता येईल?

>बेफिकीरजी ते एकत्र लिहून ते टाळता येईल

धन्यावाद....

फार सुरेख झाली आहे गझल. आवडली.

गझल आवडली
सर्वच शेर सुंदर्.

सर...

मस्त गझल !!!!!!!!
धन्यवाद!!!!
:)

sarvanche aabhar !!!

खूप आवडली

खूप आवडली