तारा असण्याचा भरला सारा सारा मी

तारा असण्याचा भरला सारा सारा मी
चमकू का थोडासा आता अंधारा मी?

सल्ले देतो... काहीही कामाचा नाही
आलो तेव्हापासुन आहे म्हातारा मी

अंशानेही वापरलेले नाही त्याला
खेचत बसतो हा मेंदूचा पेटारा मी

'हेतू आहे जगण्याचा' हे सांगत फिरणे
आवारा हा, आवारा तो, आवारा मी

माझ्या कर्तृत्वावर नसतो टिकलो येथे
लोकांच्या चांगूलपणावर जगणारा मी

केव्हा केव्हा वाहू देतो अस्तित्वाला
केव्हा बनतो स्वतः स्वतःचा बंधारा मी

ज्यांचा नाही त्यांचा होण्यासाठी जातो
ज्यांचा आहे त्यांचा करतो तिटकारा मी

पाचोळा होतानाही का झुंजत आहे?
उडता उडता धाडत माघारी वारा मी

माझ्या संदर्भात राहिलो 'बेफिकीर'... पण...
केले कवितेला शब्दांचा देव्हारा मी

गझल: 

प्रतिसाद

ज्यांचा नाही त्यांचा होण्यासाठी जातो
ज्यांचा आहे त्यांचा करतो तिटकारा मी

किती नेमक्.....अगदी सहज मांडता आपण.....

गझल खुप आवडली

ज्यांचा नाही त्यांचा होण्यासाठी जातो
ज्यांचा आहे त्यांचा करतो तिटकारा मी.. बहोत बढिया कहा है!
बढिया गझल
-मानस६

माझ्या कर्तृत्वावर नसतो टिकलो येथे
लोकांच्या चांगूलपणावर जगणारा मी

केव्हा केव्हा वाहू देतो अस्तित्वाला
केव्हा बनतो स्वतः स्वतःचा बंधारा मी

ज्यांचा नाही त्यांचा होण्यासाठी जातो
ज्यांचा आहे त्यांचा करतो तिटकारा मी

.... अप्रतिम

केले कवितेला शब्दांचा देव्हारा मी
..क्या बात है!

मस्त

तारा असण्याचा आणि ज्यांचा नाही हे दोन्ही शेर आवडले.
सोनाली

पेटारा, बंधारा सहीच! आवडली गझल.

आलो तेव्हापासुन आहे म्हातारा मी

खेचत बसतो हा मेंदूचा पेटारा मी

लोकांच्या चांगूलपणावर जगणारा मी

ज्यांचा नाही त्यांचा होण्यासाठी जातो

केले कवितेला शब्दांचा देव्हारा मी

हे सर्वच शेर सुंदर. मतलाही आवडला.
गझल अतिशय आवडली.

तिटकारा विशेष आवडला. गझलही एकंदर छान झाली आहे.

सर्वच शेर सुंदर. गझल अतिशय आवडली.....केले कवितेला शब्दांचा देव्हारा मी
..तिटकारा ...क्या बात है!

सर्वांचा आभारी आहे.

लई भारी!!!!!