दावा ..

गंध,माळा वा टिळा लावा कितीही ;
पावतो का "तो" ? करा दावा कितीही ..

तृप्त होतांना अशी अतृप्त का रे ?
वाज गोपाला तुझा पावा कितीही..

तो उद्याचा सिंह हे ध्यानी असू द्या ;
शांत हा वाटे जरी छावा कितीही ..

ताप शापाचा बरे उतरेल कैसा?
चंदनाचा लेप हा लावा कितीही ..

सत्य नाही झाकता येते कधीही ;
दाखवा खोटाच देखावा कितीही .

गझल: 

प्रतिसाद

भन्नाट आहेत सगळेच शेर.....

३-३ वेळा वाचली...कुठला एक शेर नाही देता येत ईथे....

तो उद्याचा सिंह हे ध्यानी असू द्या ;
शांत हा वाटे जरी छावा कितीही ..

सही!

सुप्रीयाजी ,क्रांती आपल्या अतिशय उत्कट प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आणि मनभर आभार !आणि आपल्या रसिकतेला सलाम !

ताप शापाचा बरे उतरेल कैसा?
चंदनाचा लेप हा लावा कितीही ...

गझल फार आवडली....

ताप शापाचा बरे उतरेल कैसा?
चंदनाचा लेप हा लावा कितीही ...

गझल फार आवडली....

वैभवजी ,धन्यवाद

एकंदर गझल छान झाली आहे.

ताप शापाचा बरे उतरेल कैसा?
चंदनाचा लेप हा लावा कितीही ..

विशेष.

चित्तरंजनजी ,खूप खूप आभार.''ताप शापाचा... हा माझाही आवडता शेर आहे.