हात होतो पुढे भिकार्यांचा
वीट आला जरी शिसार्यांचा
हात होतो पुढे भिकार्यांचा
होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्यांचा
आज नसतील... काल होते ते
ठेव आदर्श त्या सितार्यांचा
राबती जीवने कुणासाठी
कोण साहेब कर्मचार्यांचा
शेवटी भेटलीस की तूही
काय उपयोग त्या पहार्यांचा
एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्यांचा
एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्यांचा
मूक आहेत, मान्य आहे... पण
दोष आहे तुझ्या पुकार्यांचा
मी जमाखर्च ठेवला आहे
चोरलेल्या तुझ्या सहार्यांचा
आवराआवरी करू दोघे
घोळ आहे तुझ्या पसार्यांचा
शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्यांचा
तोंड माझे कुठे कुठे होते
सोसतो मी जुगार वार्यांचा
फक्त आहे तसे नसावे मी
'बेफिकिर'सा विचार सार्यांचा
गझल:
प्रतिसाद
शाम
सोम, 20/12/2010 - 18:52
Permalink
छान!!!!!! मला खूप ओघाने
छान!!!!!!
मला खूप ओघाने वाचता आली नाही...
चित्तरंजन भट
मंगळ, 21/12/2010 - 16:31
Permalink
मतला, दुसरा शेर आणि
मतला, दुसरा शेर आणि पहाऱ्यांचा विशेष. शहाऱ्यांचा नाद लागणेही विशेष. छान.
अनिल रत्नाकर
मंगळ, 21/12/2010 - 22:59
Permalink
शिसा-यांचा वीट, शहा-यांचा
शिसा-यांचा वीट,
शहा-यांचा नाद
सहा-यांचा जमाखर्च ?आणि
?वातकुक्कुट
.....अफलातुन.
विजय दि. पाटील
बुध, 22/12/2010 - 15:11
Permalink
वीट आला जरी शिसार्यांचा हात
वीट आला जरी शिसार्यांचा
हात होतो पुढे भिकार्यांचा
एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्यांचा
एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्यांचा
शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्यांचा
हे शेर खूपच आवडले!!
क्रान्ति
बुध, 22/12/2010 - 22:00
Permalink
एकदा जीव घाबरा
एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्यांचा
वा! सगळेच शेर आवडले, पण हा अधिक आवडलेला!
दशरथयादव
शुक्र, 24/12/2010 - 18:47
Permalink
एकदा जीव घाबरा
एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्यांचा
एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्यांचा
शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्यांचा
छान..........
दशरथयादव
शुक्र, 24/12/2010 - 18:47
Permalink
एकदा जीव घाबरा
एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्यांचा
एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्यांचा
शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्यांचा
छान..........
धोंडोपंत
रवि, 26/12/2010 - 10:33
Permalink
शेवटी शेवटी मजा आली लागला नाद
शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्यांचा.....
क्या बात कही है|
सुंदर सुंदर. कमीतकमी शब्दात हा विचार मांडला गेला हे विशेष आवडले.
लागला नाद त्या शहार्यांचा..... ही ओळ खासचं
शुभेच्छा
धोंडोपंत
ज्ञानेश.
शुक्र, 31/12/2010 - 09:51
Permalink
बढिया.. गजल आवडली. होत नाहीत
बढिया.. गजल आवडली.
होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्यांचा
शेवटी भेटलीस की तूही
काय उपयोग त्या पहार्यांचा
एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्यांचा
हे विशेष आवडले.
बेफिकीर
रवि, 02/01/2011 - 11:11
Permalink
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!