भाष्य
प्रेम आता मी स्वतः वर करत नाही
श्वास घेतो, हे खरे; पण जगत नाही...
भ्रमर इतके भोवती फिरती तरीही
फूल त्याच्या पाकळ्यांना मिटत नाही
प्रेम जुळल्यावर कशाला बोलशी हे -
'प्रेम आपोआप काही जुळत नाही!'
अंतरे ही वेगळी केव्हाच झाली
पण जुनी ती शपथ काही सुटत नाही
मार्ग माझा कोणता हे जाणतो मी
जात आहे जग कुठे मी बघत नाही
हसत हसवत जगत असतो रोज मी पण-
जीवनावर भाष्य करणे जमत नाही
- कुमार जावडेकर
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 29/11/2010 - 10:09
Permalink
प्रेम आता मी स्वतः वर करत
प्रेम आता मी स्वतः वर करत नाही
श्वास घेतो, हे खरे; पण जगत नाही...
वा.. 'श्वास घेतो, हे खरे; पण जगत नाही...' वाव्वा..
भ्रमर इतके भोवती फिरती तरीही
फूल त्याच्या पाकळ्यांना मिटत नाही
सुरेख...
आवडली.