बघ कशा संवेदना गातात माझ्या
फक्त दे तू हात या हातात माझ्या
बघ कशा संवेदना गातात माझ्या
मी फुलांचे ताटवे फुलवून गेलो
मोगर्याचा गंध मुक्कामात माझ्या
भक्तिने नेवैद्य मी अर्पून आलो
जेवतो माझा "विठू" ताटात माझ्या
काय तू रमते अशी भासात मझ्या
ठेव थोडा श्वास तू श्वासात माझ्या
कुंकवाचा साज भाळी रेखु दे ना
रंगु दे सौभाग्य ते रंगात माझ्या
मी हिशेबी राहिलो नाही तरीही
बेरजा - वजाबाक्या ठरतात माझ्या
मयुरेश साने....दि...२३-नोव्हेंबर-१०
गझल: