असे बाहेर डोकावू नका आतील दु:खांनो....
सुखे संचारबंदी लावती गाफील दु:खांनो
असे बाहेर डोकावू नका आतील दु:खांनो
किती लांबेल यंदाचा अबोला कल्पना नाही
तुम्हाला पाहिजे तर व्हा तिला सामील दु:खांनो
कुणी नाही इथे आता, सुटा मोकाट कोठेही
निघाला पापणीचा तांबडा कंदील दु:खांनो
सुखे छाटून थोडीशी पुन्हा येईन माघारी
पतंगासारखी देता जराशी ढील दु:खांनो?
मला वाटेल तेव्हा मी मला मानेन आनंदी
कुठे आहात तुम्हीही मला बांधील दु:खांनो?
इथे एकांत होता त्यामुळे मी हासलो थोडा
जरासे पाहिले वागून मी मिश्कील दु:खांनो
चला... अंधारते आहे... मनामध्ये बसा आता
तिन्हीसांजेस करता केवढी किलबील दु:खांनो
तिला कित्येक वर्षांनी पुन्हा भेटायचे आहे
मधे बोलायचे नाही बरे फाजील दु:खांनो?
शिव्यांची देत लाखोली उपाशी मारतो आहे
तरीही नांदता माझ्याघरी सत्शील दु:खांनो?
कुणी येणार आहे वाटते चुचकारण्यासाठी
अशी का लोचने झाली म्हणे स्वप्नील दु:खांनो?
मनाने 'बेफिकिर' व्हा... जन्मतो तो संपतो येथे
पुढे न्या आपली ही पोरकी मैफील दु:खांनो
टीप - सूट - काही र्हस्व दीर्घ!
-'बेफिकीर'!
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 22/11/2010 - 17:31
Permalink
सगळीच गझल चांगली व गोटीबंद
सगळीच गझल चांगली व गोटीबंद झाली आहे. उत्तम.
पण
इथे एकांत होता त्यामुळे मी हासलो थोडा
जरासे पाहिले वागून मी मिश्कील दु:खांनो
हा शेर तूर्तास...
तुमच्या संचारबंदीवरून माझ्या एका गझलेतला कर्फ्यू व गस्त आठवली.
बेफिकीर
सोम, 22/11/2010 - 21:17
Permalink
धन्यवाद चित्तरंजन! मला आपली
धन्यवाद चित्तरंजन!
मला आपली कर्फ्यू व गस्त ही गझल अतिशय आवडली. पाहिलेलीच नव्हती!
ही गझल माहीतच नव्हती मला!
-'बेफिकीर'!
केदार पाटणकर
मंगळ, 23/11/2010 - 09:24
Permalink
चित्तशी सहमत. पुन्हापुन्हा
चित्तशी सहमत.
पुन्हापुन्हा वाचावीशी वाटत आहे.
प्रत्येक शेरावर मेहनत घेतली आहे, असे दिसते.
छान.
मानस६
मंगळ, 23/11/2010 - 22:41
Permalink
कुणी येणार आहे वाटते
कुणी येणार आहे वाटते चुचकारण्यासाठी
अशी का लोचने झाली म्हणे स्वप्नील दु:खांनो?.. बढिया शेर
सामील, ढील हे शेर देखील आवडलेत
तांबडा कंदील का म्हणावेसे वाटले?
गझल आवडली
-मानस६
बेफिकीर
सोम, 29/11/2010 - 19:05
Permalink
केदार व मानस, आभारी आहे.
केदार व मानस,
आभारी आहे.
-'बेफिकीर'!
supriya.jadhav7
सोम, 29/11/2010 - 19:56
Permalink
चला... अंधारते आहे...
चला... अंधारते आहे... मनामध्ये बसा आता
तिन्हीसांजेस करता केवढी किलबील दु:खांनो
वाह!!!
खूप आवडला ह शेर.
सतीश
रवि, 05/12/2010 - 12:15
Permalink
सुंदर! चला... अंधारते आहे...
सुंदर!
चला... अंधारते आहे... मनामध्ये बसा आता
तिन्हीसांजेस करता केवढी किलबील दु:खांनो
तिला कित्येक वर्षांनी पुन्हा भेटायचे आहे
मधे बोलायचे नाही बरे फाजील दु:खांनो?
हे विशेष आवडले.
विजय दि. पाटील
रवि, 05/12/2010 - 16:20
Permalink
अप्रतिम गझल नेहमीप्रमाणे.....
अप्रतिम गझल नेहमीप्रमाणे.....
वैभव देशमुख
शनि, 15/01/2011 - 15:17
Permalink
वा वा.. सगळेच शेर मस्त आहेत
वा वा..
सगळेच शेर मस्त आहेत
कमलाकर देसले
शनि, 15/01/2011 - 16:25
Permalink
.बेफिकीरजी ,संपूर्ण गझल
.बेफिकीरजी ,संपूर्ण गझल अप्रतिम आहे .प्रत्तेक शेर ''शेर '' आहे