' कहाणी...'( गझल )

जो तो पळून जातो ऐकून ही कहाणी
बाजार हा खुळ्यांचा माझी व्यथा शहाणी

हे वेड पावसाचे डोळे भरून गेले
का अंतरात माझ्या ओलावली तराणी

ओझे तुझ्या कथेचे दारास टांगलेले
ना भार काळजाला का मीच दीनवाणी

हा आरसा जिवाचा केव्हाच भंगलेला
का चेहरा तुझा तो येतो खुलून राणी

जिंकून हारण्या तो मी डाव मांडलेला
माझ्या पराभवाची गातो खुशाल गाणी

ममता..

प्रतिसाद

३ रा आणि ४था आवडले..
बाकी मतल्यामध्ये तयार झालेली जमीन पाळली गेलेली नाही..