देत जा...
देत जा घेवुनी
घेत जा देवुनी
फक्त बोलू नको
कर्म कर दावुनी
शोध घ्यावा खरा
आतला आतुनी
मौन शिकवू नये
भाषणे देवुनी
आपले वागणे
जातसे सांगुनी
का नवी वाटती
रोज दु:खे जुनी
चालणे छान हे
चाल रे पाहुनी
आजची ही ख़ुशी
आज द्या वाटुनी
गझल:
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
देत जा घेवुनी
घेत जा देवुनी
फक्त बोलू नको
कर्म कर दावुनी
शोध घ्यावा खरा
आतला आतुनी
मौन शिकवू नये
भाषणे देवुनी
आपले वागणे
जातसे सांगुनी
का नवी वाटती
रोज दु:खे जुनी
चालणे छान हे
चाल रे पाहुनी
आजची ही ख़ुशी
आज द्या वाटुनी
प्रतिसाद
शाम
मंगळ, 26/10/2010 - 18:35
Permalink
मौन शिकवू नये भाषणे
मौन शिकवू नये
भाषणे देवुनी..आवडला!
मतला....?