फीतूर ....
फीतूर ....
लाजणे फीतूर होते
आरशाला दूर होते .............!!
श्वास ओले पैंजणाचे
बासरीचे सूर होते ..............!!
कंकणी जे स्पंदनी ते
मी मला काहूर होते .............!!
भाळता आभाळ भाळी
चंचला मी चूर होते ..............!!
वाळले डोळ्यात अश्रू
काजळा आतूर होते ..............!!
गाजले ओठात नाही
हारणे मंजूर होते ................!!
अंतरी तुझिया जळोनी
मी नवा अंकूर होते ..............!!
.....कविता
वृत्त :मनोरमा
गझल:
प्रतिसाद
supriya.jadhav7
शनि, 30/10/2010 - 00:59
Permalink
भाळता आभाळ भाळी चंचला मी चूर
भाळता आभाळ भाळी
चंचला मी चूर होते ..............!!
अंतरी तुझिया जळोनी
मी नवा अंकूर होते ..............!!
लाजणे फीतूर होते
आरशाला दूर होते .............!!
श्वास ओले पैंजणाचे
बासरीचे सूर होते ..............!!
हे शेर खूप आवडले.....
सूंदर गझल.
पुलेशु.
ह बा
शनि, 30/10/2010 - 18:34
Permalink
कंकणी जे स्पंदनी ते मी मला
कंकणी जे स्पंदनी ते
मी मला काहूर होते .............!!
भाळता आभाळ भाळी
चंचला मी चूर होते ..............!!
वाळले डोळ्यात अश्रू
काजळा आतूर होते ..............!!
तीनही शेर खूप आवडले!!!
मिलिन्द हिवराले
सोम, 01/11/2010 - 17:47
Permalink
वाहवा!
वाहवा!
मिलिन्द हिवराले
सोम, 01/11/2010 - 17:47
Permalink
वाहवा!
वाहवा!
विद्यानंद हाडके
मंगळ, 02/11/2010 - 09:18
Permalink
अंतरी तुझिया जळोनी मी नवा
अंतरी तुझिया जळोनी
मी नवा अंकूर होते ..............!!
वा कविता वा सुंदरच...
कविता मोकाशी
सोम, 08/11/2010 - 02:19
Permalink
खूप खूप आभारी आहे तुमची
खूप खूप आभारी आहे तुमची .....
मनापासून धन्यवाद