की ? कागदाशी खेळणारा टाक आहे ?

ज्योतिने काळोख केला ख़ाक आहे?
की उजेडाला दिव्याचा धाक आहे ?

कंदिलाला काजळीचा शाप येथे
हो ! तसे चारित्र्य माझे पाक आहे !

"वासना"! व्हावी फुलांचा "गंध" येथे ?
"नाक" नाही - तो मनाचा "बाक" आहे !

राख ही खोटी कपाळी लाउनी ! का?
"स्वार्थ" होळी पेटु दे ! ही भाक आहे ?

मी कुठे मुद्दाम हा मुक्काम केला?
मोडले माझे सुखाचे चाक आहे

काळजाशी मांडल्या संवेदना ! की ?
कागदाशी खेळणारा टाक आहे ?

मयुरेश साने ...दि..२२ ओक्ट-10

गझल: 

प्रतिसाद

मी कुठे मुद्दाम हा मुक्काम केला?
मोडले माझे सुखाचे चाक आहे
थोडा संदिग्ध वाटला..
हे सुखाने आज गिळले चाक आहे असं काहीसं म्हणायचंय का?