कोजागिरी !!!
कोजागिरी !!!
.
*
धुंदश्या तारांगणाला तारकांचा नाज होता ,
रिक्तमाझ्या ओंजळी या चंद्र माझा आज होता !
*
साजणीच्या कंकणांचा साजणा मी नादवेडा ,
मौनतेला प्रियतमेच्या घुंगरांचा बाज होता !
*
जीवघेणा दाह ओठी , श्वास-दरवळ मोग-याचा ,
सांडलेल्या मौक्तिकांना गारव्याचा साज होता !
*
चांदण्यांची शेज-सजवी झोंबरे वारे गुलाबी ,
रंगिल्या कोजागिरीचा 'प्रेम' हा रीवाज होता !
*
सावल्यांना जाग होती , पाकळ्या जेव्हा गळाल्या ,
रेशमाच्या त्या मिठीचा मखमली-अंदाज होता !
*
का स्फ़ुरावी ओढऐसी अर्धरात्री चांदण्यांना ?
झिंगलेल्या मैफ़िलीला काजव्यांचा साज होता !
*
-सुप्रिया (जोशी) जाधव.
पुणे.
गझल:
प्रतिसाद
कविता मोकाशी
शनि, 30/10/2010 - 01:02
Permalink
सावल्यांना जाग होती , पाकळ्या
सावल्यांना जाग होती , पाकळ्या जेव्हा गळाल्या ,
रेशमाच्या त्या मिठीचा मखमली-अंदाज होता !
एकदम नाजूक ....वा वा
का स्फ़ुरावी ओढऐसी अर्धरात्री चांदण्यांना ?
झिंगलेल्या मैफ़िलीला काजव्यांचा साज होता !
काजव्यांचा साज होता ...अहाहा ...मस्तच आहे ताई गझल ...
खूप आवडली