कळले नाही

फुलांतला का गंध रुतावा, कळले नाही
व्यथेसवे का स्नेह जुळावा, कळले नाही

अधांतरी अन् एकाकी टाकून मला का
हात तुझा हातून सुटावा, कळले नाही

गुन्हेगार तो असूनही 'बा-इज्जत' सुटला!
कुणी, कुठे दडपला पुरावा, कळले नाही

अजाणता मी त्याच्या वाटा तुडवित गेले,
कसला चकवा, कसा भुलावा, कळले नाही

अनोळखी मी, मलाच नाही कधी गवसले,
तुला कसा लागला सुगावा, कळले नाही

गझल: 

प्रतिसाद

अधांतरी अन् एकाकी टाकून मला का
हात तुझा हातून सुटावा, कळले नाही


वाव्वा. सुरेखच. गझलही.

अनोळखी मी, मलाच नाही कधी गवसले,
तुला कसा लागला सुगावा, कळले नाही

सुंदर. आवडला.

मतला खूप आवडला... छान गझल.

अनोळखी मी, मलाच नाही कधी गवसले,
तुला कसा लागला सुगावा, कळले नाही

आवडला!!!

आवडली..

छान गझल.
मतला जास्त आवडला!!

अधांतरी अन् एकाकी टाकून मला का
हात तुझा हातून सुटावा, कळले नाही

क्रांति, छानच...

गुन्हेगार तो असूनही 'बा-इज्जत' सुटला!
कुणी, कुठे दडपला पुरावा, कळले नाही....

मस्तच!

अनोळखी मी, मलाच नाही कधी गवसले,
तुला कसा लागला सुगावा, कळले नाही
अप्रतिम शेर!