वाटे पुन्हा पुन्हा..

रस्ता असा चुकावा वाटे पुन्हा पुन्हा..
मुक्काम हाच व्हावा.. वाटे पुन्हा पुन्हा!

चोरून भेटलो अन वचने किती दिली...
तो काळ आज यावा, वाटे पुन्हा पुन्हा..

सांगूनही जगाला, पटले कुठे इथे?
सोडून नाद द्यावा, वाटे पुन्हा पुन्हा!

मी चकवले व्यथेला, फसलीच खास ती!
काढेल पण सुगावा, वाटे पुन्हा पुन्हा!!

ईमान राखणारा पाऊस हा गडे..
आता फितूर व्हावा, वाटे पुन्हा पुन्हा!

-- बहर.

गझल: 

प्रतिसाद

मस्त,
वाचावीशी वाटते पुन्हा पुन्हा.

छान गझल.

अनिलजी.. मुटेजी.. धन्यवाद.

छान गझल
मी चकवले व्यथेला, फसलीच खास ती!
काढेल पण सुगावा, वाटे पुन्हा पुन्हा!!>>> हा शेर जास्त आवडला

वा! छान गझल. मुक्काम, सुगावा, नाद अगदी खास.

श्यामली आणि क्रांतीजी.. प्रतिसादांबद्दल आभार.

मी चकवले व्यथेला, फसलीच खास ती!
काढेल पण सुगावा, वाटे पुन्हा पुन्हा!!

एकदम मस्त शेर...

गझल आवडली.

भन्नाट!!!

धन्यवाद निलेश.. हबा..

@ हबा... आहात कुठे हबा??? बरेच दिवस दिसला नाहित आपण?

चोरून भेटलो अन वचने किती दिली...
तो काळ आज यावा, वाटे पुन्हा पुन्हा..

वाव्वा. साधेपणा फार आवडला.

धन्यवाद चित्तरंजन.