वंचना

इथला पहिलाच प्रयत्न! शिकतेय अजून!

--वंचना --
काय मी द्यावे कुणाला? मीच मोठी याचना
ओंजळी उरले न काही, ना असोशी जीवना

कोणिही यावे लुटावे, हेच नशिबी वाढले
कशि कळावी अंतराला? खरिखुरी संवेदना

शोभते जखमांत जी, ती वेदना मी पोशिली
बाळसे भोगांस आले, लोपुनी हर भावना

शोषणारे लेउनी आले ललाटी उत्तरे
शोषितांचे प्रश्न त्यांची का असावी वेदना?

का जगाला दोष द्यावे? माणसाची जात ती
खुद्द दैवानेच केली, घोर माझी वंचना

--सौ.आसावरी केळकर-वाईकर
२६.८.२०१०

गझल: 

प्रतिसाद

चांगली गझल...... दुसरा शेर वाचताना लय गेल्याची जाणीव होतेय.....

कोणिही यावे लुटावे, हेच नशिबी वाढले
कशि कळावी अंतराला? खरिखुरी संवेदना

''हेच नशिबी '' यात च-न एकत्र वाचावे लागल्याने लय जात आहे.

कशि..यात दोन्ही अक्षरे लघु केल्याने लय जात आहे...

खरिखुरी... येथे लय जात आहे...

आपण हे बदलु शकालच..... बाकी गझल आवडली.

चांगली.

कैलास
नवोदितांना योग्य मार्गदर्शन करण्याचा आपला मनाचा मोठेपणा कौतुस्कापद.

काय मी द्यावे कुणाला? मीच मोठी याचना
वा छान ओळ आहे. तुम्ही वृत्तही सांभाळले आहे.
कोणिही
कशि
खरिखुरी

असे 'ऱहस्वीकरण' टाळता आल्यास उत्तम.

हा हा हा हा.....
इथला पहिलाच प्रयत्न! शिकतेय अजून!
..... मी इथूनच वाचायला सुरुवात केली..:)

काय मी द्यावे कुणाला? मीच मोठी याचना
ही ओळ.. आणि -
शोषणारे लेउनी आले ललाटी उत्तरे
शोषितांचे प्रश्न त्यांची का असावी वेदना?
हा शेर छान.

चांगला प्रयत्न!

शोभते जखमांत जी, ती वेदना मी पोशिली
बाळसे भोगांस आले, लोपुनी हर भावना

वा! खूपच वेगळीआणि चांगली कल्पना!
गझल आवडली.

शोभते जखमांत जी, ती वेदना मी पोशिली
बाळसे भोगांस आले, लोपुनी हर भावना

वा! खूपच वेगळीआणि चांगली कल्पना!
गझल आवडली.

उत्तम सुरवातीस सुभेच्छा

मतला आणी शेवटचा शेर खुप आवडला.

शुभेच्छा!!!

वाहवा!!!