ही माणसे घनदाट देवासारखी

मज भेटलीत अफाट देवासारखी
ही माणसे घनदाट देवासारखी

तू वाटले येशील देवासारखा
मी पाहिली मग वाट देवासारखी

आला कधी ,गेला कधी ,कळले न मग
केलीस तू ,वहिवाट देवासारखी

बोलावयास पर्याय मग होता कुठे?
तू मारली जर काट देवासारखी

जी काल वेड्यासारखी अन वागली
ती आज बिनबोभाट देवासारखी

सार्‍याच वाटा बंद झाल्यावर इथे
ही सापडे मग वाट देवासारखी

निलेश कालुवाला

गझल: 

प्रतिसाद

वेगळं रदीफ.....
अजून काही कवाफी होत्या..

लाट्,ललाट्,घाट्,ताट्,खणखणाट्,फडफडाट्,तडतडाट

दोनदा वाट्,एकदा वहिवाट.... यामुळे बरीच कृत्रिमता जाणवली..

पण एकंदर चांगली गझल.

डॉ.कैलास

कैलासजी,
गझल लिहीताना आपण सुचविलेल्या काही कवाफी माझ्या ध्यानी नव्हत्याच.त्याचा चांगला उपयोग झाला असता.यावर विचार करता येईल.

खरं तर या गझलेतील रदीफाने मला भुरळ पाडली होती.एकाच बैठकीत सुचली तशी गझल लिहून काढली. त्या नादात जरा लवकर पोस्ट करायची घाई केली.आता पुन्हा वाचल्यावर लक्षात येते.

मित्रवत दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@बोलावयास पर्याय मग होता कुठे?

ही ओळ अशी वाचावी......बोलावयास पर्याय मग उरला कुठे?

अवघड रदीफ होता..
प्रयत्न आवडला..

मतला,मक्ता आणि वाट आवडला.

गझलेचे तंत्र आत्मसात करणे कठीण नाही. पण तंत्र म्हणजे गझल नाही. देवासारखे हे अन्त्ययमक उगाच जोडल्यासारखे वाटते आहे. माणसे घनदाट वरून भोवताली माणसे घनदाट होती/थेट पोचायास कोठे वाट होती ची आठवण झाली.

आनंदयात्रीजी,प्रोसाहनाबद्दल आभार.
गंगाधरजी,धन्यवाद!

चित्तजी,आपल्या मताचा आदर आहे.
धन्यवाद!

आला कधी ,गेला कधी ,कळले न मग
केलीस तू ,वहिवाट देवासारखी

छान गझल!!!

धन्यवाद ह बा जी !