सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या!

सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या..
चला, केव्हांतरी आयुष्यही जवळून पाहू या!!

दिव्या, पंख्याविना वातानुकूलीत हे असे जगणे..
चला अंधार पाहू या, जरा निथळून पाहू या!!

किती उपकार मानावे, अता ह्या भार नियमांचे?
अता ह्या शासनालाही जरा 'खवळून' पाहू या!!

समुद्राच्या जणू लाटा, तसे हे मानवी जत्थे..
चला प्रस्थापितांचे जग जरा उलथून पाहू या!!

दिव्याची वात ही साधी, तिला सांगून मी दमलो!
म्हणे!..ह्या वादळालाही जरा बिलगून पाहू या!!

-- बहर.

गझल: 

प्रतिसाद

वा वा .... छान आशय.. सुंदर गझल.

डॉ.कैलास

शेवटचे दोन आवडले..

छान गझल.
मतला, मक्ता आवडले.

सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या..
चला, केव्हांतरी आयुष्यही जवळून पाहू या!!

व्वा.
यापुढील शेरांबद्दल आकर्षण निर्माण करणारा मतला आहे.
पुढचे शेर रचतांना घाई झाल्यासारखे वाटले. त्यामुळे एकूण परिणाम बोथट झाला.
तरीही, छान गझल.

पुलेशु.

काबिले तारीफ!!!

दिव्या, पंख्याविना वातानुकूलीत हे असे जगणे..
चला अंधार पाहू या, जरा निथळून पाहू या!!

किती उपकार मानावे, अता ह्या भार नियमांचे?
अता ह्या शासनालाही जरा 'खवळून' पाहू या!!

समुद्राच्या जणू लाटा, तसे हे मानवी जत्थे..
चला प्रस्थापितांचे जग जरा उलथून पाहू या!!
भन्नाट शेर

मतला व मक्ता तुफान आवडले...

प्रत्येक शेर अगदी सखोल विचारांती रचलेला... शब्द न शब्द परफेअक्ट आणि
सगळेच्या सगळे शेर जबरदस्त परिणामकारक आहेत.

अभिनंदन बहर!!!

दिव्याची वात ही साधी, तिला सांगून मी दमलो!
म्हणे!..ह्या वादळालाही जरा बिलगून पाहू या!!

वा. फार मस्त. असेच लिहीत राहा. दुसरी द्विपदीही चांगली झाली आहे.

किती उपकार मानावे, अता ह्या भार नियमांचे?
अता ह्या शासनालाही जरा 'खवळून' पाहू या!!

माझे मत हा किंवा असा शेर गझलेत टाळावे असे आहे.

उर्वरित दोन द्विपदींची वीण घट्ट नाही. उदा. सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या.. अशी प्रॉमिसिंग सुरवात झाल्यावर खालची ओळ थोडी दुरून जाते.

दिव्याची वात ही साधी, तिला सांगून मी दमलो!
म्हणे!..ह्या वादळालाही जरा बिलगून पाहू या!!

खुप तगडा शेर आहे...खुप आवड्ला!!!

सर्वांचे आभार! कैलासजी..गांधीजी.. चित्तरंजन..हबा...आनंदयात्री, ज्ञानेश.. सर्वांचेच!

दिव्याची वात ही साधी, तिला सांगून मी दमलो!
म्हणे!..ह्या वादळालाही जरा बिलगून पाहू या!!

सुंदर शेर. मस्त गझल.

सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या..
चला, केव्हांतरी आयुष्यही जवळून पाहू या!!

बहर.....अख्खी गझल कॉपी पेस्ट करू का?अहो खुप छान लिहीलीत.गझलेतील आशय जास्त आवडला.

शेवटचा शेर मस्तच. आवडला.

निलेश...

As you write more personal... it becomes more universal!
असं म्हटलंच आहे कुणीतरी... धन्यवाद.:)

-- बहर.

सोनालीताई.. धन्यवाद.

फारच सुरेख.