उगीच का प्राण....
उगीच का प्राण साचून जातो
नको तिथे जीव टाचून जातो
कसे तुला आज सांगू मना रे..
तुझाच सहवास जाचून जातो
पहा जरा चेहरा फक्त माझा
उरातले दु:ख वाचून जातो
जमीन माझी नसे, ना नभांगण
अधांतरी देह नाचून जातो
जगास मी दोष द्यावा कशाला ?
मनातला भाव काचून जातो
गझल:
प्रतिसाद
अनिल रत्नाकर
सोम, 09/08/2010 - 00:53
Permalink
पहा जरा चेहरा फक्त
पहा जरा चेहरा फक्त माझा
उरातले दु:ख वाचून जातो
अप्रतिम
कैलास
सोम, 09/08/2010 - 06:26
Permalink
वा वा .. छान गझल. मतला विशेष
वा वा .. छान गझल.
मतला विशेष आवडला.
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
सोम, 09/08/2010 - 11:28
Permalink
मतला, वाचून आणि नाचून आवडलेत.
मतला, वाचून आणि नाचून
आवडलेत.
ह बा
सोम, 09/08/2010 - 20:58
Permalink
जमीन माझी नसे, ना
जमीन माझी नसे, ना नभांगण
अधांतरी देह नाचून जातो
छान शेर. चांगली गझल!
निलेश कालुवाला
शनि, 14/08/2010 - 08:22
Permalink
उगीच का प्राण साचून जातो नको
उगीच का प्राण साचून जातो
नको तिथे जीव टाचून जातो
जमीन माझी नसे, ना नभांगण
अधांतरी देह नाचून जातो
गझल आवडली.