पराक्रमी असा मी

पराक्रमी असा मी

माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो

ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही
उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो

त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली
टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो

आधार लेखनीला खंबीर मेज आहे
सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो?

प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी
अंधार ही अताशा संगे मलाच नेतो

उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला,
तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो

ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी
तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो

ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते
नावात एक धागा का अभय आढळे तो?

गंगाधर मुटे
.........................................

गझल: 

प्रतिसाद

छान गझल मुटेजी. सगळेच शेर आवडले... वा वा!

उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला,
तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो

:)

डॉ.कैलास

टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो
गजरा टुणकून उडतो आणि मग खोचते कोण? तो खोचत असल्यास खोचतो तो हवे नाही का?

तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो
उंटीण चुंबते तो म्हणजे काय? त्याला म्हणायचे आहे का? आणखी स्वच्छ आणि सफाईदार लिहायचा प्रयत्न हवा.

तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो
धन्यवाद फक्त पंजाला आवडतो असे म्हणायचे आहे का? भरीची ओळ वाटते किंवा मला कळला नाही. शक्य झाल्यास समजावून सांगावे, ही विनंती.

ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते
अभय गाडगीळ पूना गाडगीळवाले, अभय टिळक अर्थतज्ज्ञ माहीत आहेत. त्यांच्याबद्दल बोलत आहात काय?

चित्तजी,
वरील चारही शेरात मला जे व्यक्त करायचे होते ते मी व्यक्त केले पण वाचतांना ते तसे व्यक्त/स्पष्ट होत नसावे.
नेमकी गडबड माझ्याही ल़क्षात येत नाही.
हेच शेर मी, आहे तोच आशय तंतोतंत कायम ठेवून नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो.
कदाचित त्यामुळे माझी चूक माझ्या लक्षात येईल.

चित्तजी,
वरील शेरांचा अर्थ मी गद्यात सांगण्याऐवजी नव्या शेरात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो

संवेदना कशी ही इतकी बधीर झाली?
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो

उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला,
तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो

उच्चांक गाठतांना बेबंद धूर्ततेचा
उंटीणिला शिडीने चंगून चुंबते तो

चंगने = चढणे

ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी
तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो

ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी
बस धन्यवाद केवळ सर्वास आवडे तो

ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते
नावात एक धागा का अभय आढळे तो?

ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते
नावात एक धागा का "अभय" तुज दिसे तो?

मला आशा आहे की थोडा सुटसुटीतपणा आला असावा.

मात्र कविता आणि गझल हे मांडणी ,आशय या बाबतीत पुर्णत: भिन्न प्रकार आहेत हे आज कळले.

चुंबते तो ऐवजी चुंबतो तो असे लिहायचे असते का?
तसे असेल तर नवा शेर ही "वांगे खायला गेला", असे म्हणावे लागेल.