'' कैलास ''

'' कैलास ''

जखडू पाहे हर श्वास मला
जीवन वाटे गळफास मला

का जपतो मी हर क्षण आता?
सोडुन गेले दिन-मास मला

नावडले जे कधिच्या काळी
लागे त्याचाही ध्यास मला

जोखुन आता मम पाणी 'ते'
छळतील उद्या बिंदास मला

उपदेश दुज्यास विरक्तीचा
हर गोष्टीचा हव्यास मला

'' संयत्,शिक्षित नेते असतिल ''
छळतात कधीचे भास मला

लेखीच '' बड्यां''च्या ''आम'' जरी,
छोटे ओळखती '' खास '' मला

मी कोण कशाला पुसतो तू?
सगळे म्हणती '' कैलास '' मला.

-डॉ.कैलास गायकवाड.

गझल: 

प्रतिसाद

मतल्यातील ''डु'' , डू असा वाचावा.

डॉ.कैलास

हव्यास आणि खास
खास आवडलेत.

बिंदास आणि हव्यास आवडले.
सूंदर गझल कैलासजी!!!

का जपतो मी हर क्षण आता?
सोडुन गेले दिन-मास मला

जोखुन आता मम पाणी 'ते'
छळतील उद्या बिंदास मला

उपदेश दुज्यास विरक्तीचा
हर गोष्टीचा हव्यास मला

'' संयत्,शिक्षित नेते असतिल ''
छळतात कधीचे भास मला

गझलेतील या शेरांचा आशय आवडला.शुभेच्छा कैलासजी.

मी कोण कशाला पुसतो तू?
सगळे म्हणती '' कैलास '' मला.
छान ;)

नावडले जे कधिच्या काळी
लागे त्याचाही ध्यास मला
कधिच्या काळी कानांना खटकले. एकेकाळी किंवा कोण्या काळी असे काहीसे बरे वाटेल.

जोखुन आता मम पाणी 'ते'
मम टाळता आल्यास उत्तम. जोखुन आता माझे पाणी किंवा ते हवे असल्यास जोखुनिया ते माझे पाणी ही चालून जावे.

मुटेजी,हबा,निलेश... मनःपूर्वक धन्यवाद...

मक्ता आवडल्याबद्दल धन्यवाद चित्तजी

नावडले जे कधिच्या काळी
लागे त्याचाही ध्यास मला

ह्या शेरात पहिला मिसरा दुरुस्तीचे समीर चव्हाण यांनी ही सुचवले होते.....
आपण सुचवलेले ''नावडले जे एके काळी'' हे चपखल वाटतेय.... .. मनःपूर्वक धन्यवाद..

मम टाळावा हे बर्‍याच तज्ञांचे सांगणे आहे.... ( अप्पा ठाकूर्,विनायक त्रिभुवन्,ललिता बांठियाजी ) वगैरे...... आपण जसे बोलतो तशा ओळींत गझल यावी अश्या प्रकारची त्यांची सुचवण आहे.''मम '' आपण बोलताना सहसा वापरत नाही म्हणून तो टाळावा हे सर्वथा मान्य.

''जोखुन आता माझे पाणी'' ही ओळ फर्मास.... पुनश्च धन्यवाद.

डॉ.कैलास

नेहमीप्रमाणेच सर्वांगसुंदर.
मक्त्यावर चांगलीच मास्टरी मिळवली आहे.

डॉक्टरसाहेब... मस्त गझल. बर्‍याच दिवसांनी इथे आलो आज. सगळं वाचून काढतो.

सूंदर गझल कैलासजी!!!

धन्यवाद अनिल,
धन्यवाद बहर,
धन्यवाद कैलास राव.

डॉ.कैलास