शंकर रामाणींची गझल

कविवर्य शंकर रामाणींची गझल ( 'दर्पणीचे दीप ' या काव्यसंग्रहातून)

अजुनी भुऱ्या दिशांचे मी हुंगतो किनारे
आयुष्य लासणारे मी पोसले निखारे

केली कुणी कळेना असली कठोर शिक्षा
प्रारब्ध राजबंदी; चौकीवरी पहारे..

ज्या लाविल्या कुणी त्या विझल्या अता मशाली;
बेभान नादती का दूरातले निखारे

माझ्यातली पुराणी उध्वस्त धर्मशाळा;
आरण्य आठवांचे दगडी तिथे ढिगारे

शिल्पायुषी जगाला तेजाळ जाग आली
आभास तू; कुणाचे हिरवे मला इशारे?

घाटातली विरागी ही वाट एकट्याची;
या आतल्या उजेडी उघडी विराट दारे
--------------------------------------------------------

(जयन्ता५२)

प्रतिसाद

वा वा .... सुंदर गझल.
जयंतजी,हा संग्रह मुंबई/नव्या मुंबईत कुठे उपलब्ध आहे?

डॉ.कैलास