माझ्या मनात थोडे...

माझ्या मनात थोडे सांडून चांदणे
गेले कुणीतरी हे देऊन चांदणे

जेव्हा पुन्हा नव्याने उगवेल चंद्र तो
घेईन मी नव्याने वेचून चांदणे

करतो विचार आहे केवळ तुझाच मी
आहे जणू मला ते वेढून चांदणे

मी ऊब चांदण्याला देऊन पाहिली
गेले हळूच होते पेटून चांदणे

लोभस बरीच भासे माझी जुनी व्यथा
येते जशी इथे ती नेसून चांदणे

गझल: 

प्रतिसाद

व्वा... छान.

डॉ.कैलास

केदार,
साधीच पण लोभसवाणी गझल, अंतीम शेर खास!
जयन्ता५२

माझ्या मनात थोडे सांडून चांदणे
गेले कुणीतरी हे देऊन चांदणे
.
लोभस बरीच भासे माझी जुनी व्यथा
येते जशी इथे ती नेसून चांदणे

मस्त.

मी ऊब चांदण्याला देऊन पाहिली
गेले हळूच होते पेटून चांदणे
फार छान.

धन्यवाद, मित्रहो.


जेव्हा पुन्हा नव्याने उगवेल चंद्र तो
घेईन मी नव्याने वेचून चांदणे

वा! फार आवडला. गझल छानच झाली आहे.

माझ्या मनात थोडे सांडून चांदणे
गेले कुणीतरी हे देऊन चांदणे
,,,,,,,,,,,,,आल्हादक

जेव्हा पुन्हा नव्याने उगवेल चंद्र तो
घेईन मी नव्याने वेचून चांदणे
,,,,,,,,,आश्वासक

करतो विचार आहे केवळ तुझाच मी
आहे जणू मला ते वेढून चांदणे
,,,,,,,,,,आस्वादक

मी ऊब चांदण्याला देऊन पाहिली
गेले हळूच होते पेटून चांदणे
,,,,,,,,,,ऊन्मादक

लोभस बरीच भासे माझी जुनी व्यथा
येते जशी इथे ती नेसून चांदणे
,,,,,,,,,भन्नाटक गझल.

लोभस बरीच भासे माझी जुनी व्यथा
येते जशी इथे ती नेसून चांदणे

मस्त गझल! हा शेर खूप आवडला!!!

धन्यवाद, मित्रहो.