टोचले होते..

टोचले होते जगाने; खंत नाही
बोचले होते तुझेपण शब्द काही

घे, तुला सारेच माझे मोकळे घर..
पण मला ठेवायची आहे नशाही

काळजी घेतो जशी माझ्या मुलीची
अन् तशी सांभाळतो मी वेदनाही

लेकरे नव्हती तरी सांभाळले जग
अन् कुणी नुसतेच बनते वंशवाही

थांबले नाहीत डोळ्यातून अश्रू
केवढे होते तिचे जीवन प्रवाही

का? कशाला व्हायचे मी फार मोठे?
दर्शवीतो सत्य छोटा आरसाही

वाटले हलके तुला मी भेटण्याने
अन् बरा नसतोच तोरा एवढाही

केवढे बोलून गेलो आज आपण
कोणताही शब्द ना उच्चारताही

जेवढी आसूस असते प्रेयसीची
वाट तितकी देव बघतो आतलाही

गझल: 

प्रतिसाद

फार छान गझल. असेच लिहीत राहा.

टोचले होते जगाने; खंत नाही
बोचले होते तुझेपण शब्द काही

केवढे बोलून गेलो आज आपण
कोणताही शब्द ना उच्चारताही

गझल आवडली...

वाव्वा.. सुरेख गझल !

घे, तुला सारेच माझे मोकळे घर..
पण मला ठेवायची आहे नशाही

थांबले नाहीत डोळ्यातून अश्रू
केवढे होते तिचे जीवन प्रवाही

केवढे बोलून गेलो आज आपण
कोणताही शब्द ना उच्चारताही

हे शेर जास्त आवडले- 'प्रवाही' तर खासच !

जेवढी असते असोशी प्रेयसीची??

अप्रतिम.
टचिंग.
भारावलेली.

चित्तरंजन, वैभव, ज्ञानेश, अनिल धन्यवाद!

काळजी घेतो जशी माझ्या मुलीची
अन् तशी सांभाळतो मी वेदनाही

क्या बात है! खूप आवडली गझल.

थांबले नाहीत डोळ्यातून अश्रू
केवढे होते तिचे जीवन प्रवाही

का? कशाला व्हायचे मी फार मोठे?
दर्शवीतो सत्य छोटा आरसाही

गझल तर आवडलीच पण हे दोन शेर खास आवडले!!!

टोचले होते जगाने; खंत नाही
बोचले होते तुझेपण शब्द काही

केवढे बोलून गेलो आज आपण
कोणताही शब्द ना उच्चारताही

मस्त.

क्रांति, ह.बा., गंगाधर, निलेश धन्यवाद!

आजच वाचली.
अख्खी गझल आवडली.फारच छान.