खुळा साज आहे..
कुणी का पुसावे?.. कसा आज आहे?
जसा काल होता.. तसा माज आहे!!
किती टाळले नियतीचे इशारे..
("तुझा" आजही आंत आवाज आहे!!)
नसे आजच्या बोलण्या अर्थ काही..
मौनासही हया "मुका" बाज आहे!!
उमलतांच मी, ती कळी कां मिटावी?
कसा मोगराही दगाबाज आहे!!
सत्यास कवडी, असत्यास रुपया!!
नसावी जगाला... मला लाज आहे!!
"मनीं" गाडले दुःख ते, विरह तो मी..
तुम्हाला जमेना?.. तुम्हा "ताज" आहे!!
कसा आज झंकारला वेदनेने..
मनाचाच माझ्या खुळा साज आहे!
-- बहर.
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 21/07/2010 - 13:12
Permalink
मतला आवडला...... छान
मतला आवडला...... छान गझल.
दुसर्या शेरातील नि,दीर्घ हवा.
डॉ.कैलास
विश्वस्त
बुध, 21/07/2010 - 13:19
Permalink
मौनासही हया "मुका" बाज
मौनासही हया "मुका" बाज आहे!!
सत्यास कवडी, असत्यास रुपया!!
किती टाळले नियतीचे इशारे..
वरील ओळी तपासून दुरुस्त कराव्यात.
बहर
बुध, 21/07/2010 - 13:46
Permalink
कैलासजी.. नियती हा शब्द नि
कैलासजी.. नियती हा शब्द नि र्हस्व लिहूनच लिहीतात बहुतेक. आपण वृत्तसाठी म्हणत आहात का?
खरं म्हणजे आधी नी असाच लिहीला होता... पण नंतर परत खोडुन र्हस्व लिहीला. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
प्रिय विस्वस्त..
किती टाळले नीयतीचे इशारे हे समजले.
इतर दोन ओळींमध्ये काय चुकले आहे ते कृपया सांगावे.
कैलास
बुध, 21/07/2010 - 13:58
Permalink
@ बहर आपण ही गझल '' भुजंग
@ बहर
आपण ही गझल '' भुजंग प्रयात '' या वृत्तात लिहिली आहे....
याची लगावली लगागा लगागा लगागा लगागा अशी आहे.
यानुसार प्रत्येक शेरातील पहिले अक्षर लघु असायला हवे
मौनासही मध्ये मौ हा दीर्घ आहे (२ मात्रा )----
सत्यास मध्येही स हा दीर्घ आहे (२ मात्रा ) उच्चार असा होतो .... सत ---- या ----स (गा गा ल )
वरील दुरुस्त्या करुन गझल पुनश्च लिहावी.... आणि आपण ते उत्तम रित्या कराल यात शंकाच नाही.
डॉ.कैलास
बहर
बुध, 21/07/2010 - 14:39
Permalink
अरे हो... "भुजंगप्रयाती" हे
अरे हो... "भुजंगप्रयाती" हे शाळेत पाठ केल्याचे स्मरते. अभ्यास तेव्हाच नीट करायल हवा होता!! हा हा!! धन्यवाद कैलासजी. पुनर्लेखन करायचा प्रयत्न करतो.
गंगाधर मुटे
बुध, 21/07/2010 - 19:04
Permalink
मतला फारच आवडला. बाकी शेर
मतला फारच आवडला.
बाकी शेर सुंदरच.
बहर
बुध, 21/07/2010 - 19:33
Permalink
@ कैलासजी.. मुलाहिजा
@ कैलासजी.. मुलाहिजा फर्मायें...
नसे आजच्या बोलण्या अर्थ काही..
मौनासही हा "मुका" बाज आहे... ह्या ऐवजी..
नसे आजच्या बोलण्या अर्थ काही..
उगे राहण्याचा "मुका" बाज आहे!
आणि
सत्यास कवडी, असत्यास रुपया
नसावी जगाला..मला लाज आहे..
हा न घेता..
जळी वा स्थळी, काष्ठ पाषाण..सारे..
जिथे पाहिले मी.. तुझी "गाज" आहे!
( गाज - समुद्राचा दूरवरून येणारा आवाज.)
कैलास
बुध, 21/07/2010 - 20:04
Permalink
व्वा... क्या बात है
व्वा... क्या बात है राहुल....... मस्तच
फक्त दुसर्या शेरात आशयासहित पूर्णच बदल केलायस..... म्हणजे एक नवीनच शेर तयार झालाय.....
दुसर्या शेरात आशय छान आहे....... ते हि तुला जमायला काही अडचण नाही. असो..
अभिनंदन... उत्तम गझल.
डॉ.कैलास
बहर
बुध, 21/07/2010 - 21:33
Permalink
धन्यवाद कैलासजी.. मार्गदर्शन
धन्यवाद कैलासजी.. मार्गदर्शन होत रहावे. लोभ असावा.
आनंदयात्री
सोम, 26/07/2010 - 22:44
Permalink
किती टाळले नियतीचे
किती टाळले नियतीचे इशारे..
("तुझा" आजही आंत आवाज आहे!!)
फक्त हाच आवडला...
अनिल रत्नाकर
मंगळ, 27/07/2010 - 00:32
Permalink
छान आहे. मनाच्या श्लोकाची चाल
छान आहे.
मनाच्या श्लोकाची चाल लागते.
य य य य
फक्त
"मनीं" गाडले दुःख.........ते, विरह तो मी..
तुम्हाला जमेना?.. तुम्हा "ताज" आहे!!
येथे अडखळायला होते.