पाणपोई

रात्र सारी नशीला बाण होई
तोल जाताच का हैराण होई?

टाळते बोलणे माझ्यासवे ती
जीवनाचेच आज मचाण होई

आटले मृगजळांचे स्वप्नसाठे
रिक्त होती मनीची पाणपोई

नाव माझेच आता राहिले ते
कापली मान त्यांनी जाण होई

तोकडे ज्ञान माझे व्यर्थ वाही
तंग संस्कार, ओढा ताण होई

वेळ थोडाच आहे, सांगती ते
चाल तू, गाढवाला आण डोई

गझल: 

प्रतिसाद

सगळीकडे '' होई'' ही रदीफ असताना ३ र्‍या व ६ व्या शेरात पाणपोई व डोई हे रदीफ कसे चालतिल?

बाकी ...... खरं सांगतो अनिलराव...... गझल आवडली नाही.

डॉ.कैलास

अनिलजी गझल छानच आहे. कैलासजी म्हणतायत तिकडे लक्ष द्या... तुमची माझी लिहीण्याची शैली, आपली मांडणी काही अंशी एकसारखी आहे असे वाटते.... त्यामुळे मला तुमच्या गझला आवडतातच. व्याकरणाच्या घोळातुन बाहेर या.

आशय आवडला.
बाकी तंत्रदुरूस्ती बघावी.

तोल जाताच का हैराण होई?
ऐवजी
तोल जाताच का हैराण भोई ,, असा ऊला मिसरा घेतला तर मतला साफ होईल का?

कैलासजी, मी आपला सतत अपेक्षाभंग करतो आहे त्याबद्द्ल क्षमस्व.
मतला सोडुन बाकीचे शेर आधी लिहीले नंतर वारीला सेवेला चार दिवस गेलो होतो. त्यामुळे लिंक तुटली व चुक झाली.
अर्थात हे काही समर्थन नाही.असो. रोख प्रतिक्रीयेबद्द्ल आभार
ह.बा., आपण यशस्वी गझलकार आहात, मी शाब्दिक जोडतोड करत प्रयत्न करतो, आपल्यात द बा धरुन बसलेल्या
साधेपणाला कुर्निसात.
गंगाधरजी, धन्यवाद.

तंग संस्कार, ओढा ताण होई
वावा...

धन्यवाद आनंदयात्रीजी
ह्या गझलेने मतल्यातच माती खाल्याने लवकरात लवकर दुस-या पानावर जावी असे वाटत होते. असो.
प्रोत्साहनाबद्द्ल ऋणी.