असे नव्हे

चंद्र दुपारी दिसतच नाही... असे नव्हे
मनासारखे घडतच नाही... असे नव्हे

जरी जगाला सदैव मी हसरा दिसतो
मला जिंदगी छळतच नाही... असे नव्हे

तशी तर मला रोजच कविता सुचते... पण -
तिला कधी मी सुचतच नाही... असे नव्हे

नको बाळगू गर्व फुका तारुण्याचा
नवी पालवी झडतच नाही... असे नव्हे

चुकलो मीही असे वाटले... वाटेला
वाट कधीही चुकतच नाही... असे नव्हे

किती काळ सोसेल चेहर्‍यांना तोही
पारा त्याचा चढतच नाही... असे नव्हे

गूढ, स्तब्ध, एकाकी दिसते जरी तळे
तरंग नकळत उठतच नाही... असे नव्हे

झोकुन देणे जमले की सारे जमते
जगण्याचा तळ मिळतच नाही... असे नव्हे

खंत कशाला कपड्यांवरच्या डागांची?
निळे वस्त्रही मळतच नाही... असे नव्हे

गझल: 

प्रतिसाद

चुकलो मीही असे वाटले... वाटेला
वाट कधीही चुकतच नाही... असे नव्हे
वाव्वा.

तशी तर मला रोजच कविता सुचते... पण -
तिला कधी मी सुचतच नाही... असे नव्हे

वा.

ह्यावरून पुलस्ति ह्यांची
मला सुचेना कविता आता
मी कवितेला सुचेन म्हणतो

ही द्विपदी आठवली.

सगळेच शेर छान झाले आहेत. गझल चांगली झाली आहे.

झोकुन देणे जमले की सारे जमते
जगण्याचा तळ मिळतच नाही... असे नव्हे
गझल आवडली.....

तशी तर मला रोजच कविता सुचते... पण -
तिला कधी मी सुचतच नाही... असे नव्हे

चुकलो मीही असे वाटले... वाटेला
वाट कधीही चुकतच नाही... असे नव्हे

झोकुन देणे जमले की सारे जमते
जगण्याचा तळ मिळतच नाही... असे नव्हे

अप्रतिम!

वा. छान लिहीलीत ही गझल. सदिच्छा!

चुकलो मीही असे वाटले... वाटेला
वाट कधीही चुकतच नाही... असे नव्हे

मस्त शेर!
गझल आवडली.

जरी जगाला सदैव मी हसरा दिसतो
मला जिंदगी छळतच नाही... असे नव्हे
.
नको बाळगू गर्व फुका तारुण्याचा
नवी पालवी झडतच नाही... असे नव्हे
.
किती काळ सोसेल चेहर्‍यांना तोही
पारा त्याचा चढतच नाही... असे नव्हे
.
गूढ, स्तब्ध, एकाकी दिसते जरी तळे
तरंग नकळत उठतच नाही... असे नव्हे
.
झोकुन देणे जमले की सारे जमते
जगण्याचा तळ मिळतच नाही... असे नव्हे

अप्रतिम.
खुप आवडले.

मतला, २,३,५, ८, ९...
जाऊ देत.

सगळेच शेर मस्त !!!
अभिनंदन.

दोस्तहो अनेक धन्यवाद

तशी तर मला रोजच कविता सुचते... पण -
तिला कधी मी सुचतच नाही... असे नव्हे

चुकलो मीही असे वाटले... वाटेला
वाट कधीही चुकतच नाही... असे नव्हे

झोकुन देणे जमले की सारे जमते
जगण्याचा तळ मिळतच नाही... असे नव्हे

अप्रतिम!
खुप आवडले.

भन्नाट! सगळ्याच द्विपदी उल्लेखनीय.
झोकुन देणे केवळ अप्रतिम!

खूपच छान आणि हळुवार गझल आहे मिल्या. मस्त!!
शुभेच्छा!

अप्रतिम गझल.

अतिशय अर्थगर्भ आणि गेय अशा ओळी.

संवेदना कवीच्या अन सुख गर्भिणीचे
आम्हां निपुत्रिकांना सदैव कळतील.. असे नव्हे

मनाची वाचा आणि शब्दांचा साचा
दोहोंचे छत्तीस गुण नेहमीच जुळतील.. असे नव्हे

झकास ! असेच भरपूर आणि भरघोस लिहा.

अप्रतिम गझल.