आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
वेळ येता विश्व सारे जाळती माझे नयन
तीक्ष्ण ज्या बाणांनी मज घायाळ केलेले कधी
तेच विभ्रम्,नी कटाक्षे टाळती माझे नयन
बंधनी मज ठेवण्या केले कितीही कायदे,
फक्त माझ्या कायद्यांना पाळती माझे नयन
शुष्क झाले दु:ख इतके पचवुनी ' हे' की अता
आसवे कुठली कशाला ढाळती माझे नयन ?
आज का ''कैलास'' डोळे राहुनी तू आंधळा ?
मोतीबिंदूगत सया सांभाळती माझे नयन.
डॉ.कैलास गायकवाड.
गझल:
प्रतिसाद
ह बा
मंगळ, 20/07/2010 - 21:11
Permalink
बंधनी मज ठेवण्या केले कितीही
बंधनी मज ठेवण्या केले कितीही कायदे,
फक्त माझ्या कायद्यांना पाळती माझे नयन
हा शेर अल्टी! गझल छान.
बहर
बुध, 21/07/2010 - 04:38
Permalink
हे कुठले वृत्त आहे? माहिती
हे कुठले वृत्त आहे? माहिती द्यावी.
गझल छानच झाली आहे. फक्त..
"तीक्ष्ण ज्या बाणांनी मज घायाळ केलेले कधी
तेच विभ्रम्,नी कटाक्षे टाळती माझे नयन"
ह्या शेर मध्ये अर्धी मात्रा अधिक आहे असे वाटते.
बाकी मतला.. कायदे..मक्ता.. आवडले.
कैलास
बुध, 21/07/2010 - 10:17
Permalink
हे देवप्रिया वृत्त आहे
हे देवप्रिया वृत्त आहे गालगागा गालगागा गालगागा गालगा अशी लगावली आहे.
तीक्ष्ण ज्या बा = गालगागा = तेच विभ्रम
णांनि मज घा = गालगागा = नी कटाक्षे
याळ केले = गालगागा = टाळती मा
ले कधी = गालगा = झे नयन
अर्धी मात्रा ही संकल्पना माझ्यासाठी नवी आहे.मात्रा १ किंवा २ असतात.....
बाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद बहर राव.
डॉ.कैलास
बहर
बुध, 21/07/2010 - 19:53
Permalink
कैलासजी... दोष माझा आहे!! मी
कैलासजी... दोष माझा आहे!! मी मुळात तबलजी असल्याने अर्ध्या मात्रा मोजण्याची सवय झाली आहे!! हा हा!! तिथे ती ओळ म्हणताना अडखळलो एवढेच.
ज्ञानेश.
बुध, 21/07/2010 - 20:05
Permalink
आसवे आता न केवळ गाळती माझे
आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
वेळ येता विश्व सारे जाळती माझे नयन
छान शेर आहे, आवडला.
(बाणांनी मधे- 'नि'र्हस्व उच्चारावा लागतो आहे.)
गंगाधर मुटे
बुध, 21/07/2010 - 21:38
Permalink
आसवे आता न केवळ गाळती माझे
आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
वेळ येता विश्व सारे जाळती माझे नयन
-
तीक्ष्ण ज्या बाणांनी मज घायाळ केलेले कधी
तेच विभ्रम्,नी कटाक्षे टाळती माझे नयन
-
शुष्क झाले दु:ख इतके पचवुनी ' हे' की अता
आसवे कुठली कशाला ढाळती माझे नयन ?
छान आवडलेत.
निलेश कालुवाला
मंगळ, 27/07/2010 - 09:50
Permalink
आसवे आता न केवळ गाळती माझे
आसवे आता न केवळ गाळती माझे नयन
वेळ येता विश्व सारे जाळती माझे नयन
बंधनी मज ठेवण्या केले कितीही कायदे,
फक्त माझ्या कायद्यांना पाळती माझे नयन
कैलासजी,छान गझल.वरील दोन शेर आवडले.डोळ्यांवरचा माझाही एक शेर घ्या.
हसत जे केलेस तू ते
घाव डोळ्यांचेच होते
कैलास गांधी
मंगळ, 27/07/2010 - 12:08
Permalink
तीक्ष्ण ज्या बाणांनी मज घायाळ
तीक्ष्ण ज्या बाणांनी मज घायाळ केलेले कधी
तेच विभ्रम्,नी कटाक्षे टाळती माझे नयन
छान आवडले
कैलास
बुध, 28/07/2010 - 18:16
Permalink
धन्यवाद ज्ञानेश...... नि
धन्यवाद ज्ञानेश...... नि र्हस्वच आहे..... संपादनाची सुविधा नसल्याने नी च राहिलाय.... पुनश्च धन्यवाद.
गंगाधरजी धन्यवाद...
धन्यवाद निलेश.....
आपला शेर वाचून ए.के.शेख यांची गझल आठवली..... '' नाव मित्राचेच होते नेमके ''
कैलासराव... मनःपूर्वक आभार.
डॉ.कैलास
अजय अनंत जोशी
सोम, 02/08/2010 - 07:54
Permalink
मतला छान. आवडला. शुभेच्छा!!
मतला छान. आवडला.
शुभेच्छा!!
अनिल रत्नाकर
मंगळ, 03/08/2010 - 01:06
Permalink
मतला अफलातुन.
मतला अफलातुन.