आरसा पाहायचा राहून गेला
आरसा पाहायचा राहून गेला
चेहरा निरखायचा राहून गेला
यायची वचने फक्त मजला मिळाली
बोलला तो यायचा राहून गेला
मी कधीना पालखी कवितेस केली
शब्द हा मिरवायचा राहून गेला
न्याय मिळला ना कधी मज, तर कधी हा
फैसला लागायचा राहून गेला
रे जगी देवा तुझ्या सारेच होते
कोण तो राहायचा राहून गेला
माहिती झालो न मी केव्हा कुणाला
ढोल हा बडवायचा राहून गेला
गझल तू केली पण सफाई न आली
नूर तो गवसायचा राहून गेला
निलेश कालुवाला.
गझल:
प्रतिसाद
कैलास
सोम, 19/07/2010 - 15:08
Permalink
व्वा निलेश...... नूर तर
व्वा निलेश...... नूर तर गवसला मित्रा.... सुंदर गझल...
माहिती झालो न मी केव्हा कुणाला
ढोल हा बडवायचा राहून गेला
गझल तू केली पण सफाई न आली
नूर तो गवसायचा राहून गेला
हे दोन खासच.
यायची वचने फक्त मजला मिळाली
बोलला तो यायचा राहून गेला
यात मंजुघोषा भंगतोय....
यायची ती फक्त वचने मज मिळाली असे काहिसे करुन पहावे.
बाकी गझल सुरेख....
डॉ.कैलास
ह बा
बुध, 21/07/2010 - 11:19
Permalink
मी कधीना पालखी कवितेस
मी कधीना पालखी कवितेस केली
शब्द हा मिरवायचा राहून गेला
अल्टी.
वाचायची राहुन गेली होती. छान गझल!!!
बहर
गुरु, 22/07/2010 - 02:03
Permalink
झकास!! निलेशजी... लिहीत रहा.
झकास!! निलेशजी... लिहीत रहा. बोरकरांचं "लिहीता हातवळा" वाचल्याचं स्मरतं. चित्तरंजनही आणि अनेक मान्यवर हेच सांगत असतात. मी ही तेच करतोय. क्या बात है.
गंगाधर मुटे
गुरु, 22/07/2010 - 09:00
Permalink
माहिती झालो न मी केव्हा
माहिती झालो न मी केव्हा कुणाला
ढोल हा बडवायचा राहून गेला
छान गझल.
निलेश कालुवाला
मंगळ, 27/07/2010 - 08:13
Permalink
खुप आभार
खुप आभार कैलासजी.प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
'यायची ती फक्त वचने मज मिळाली' दुसर्या शेरात आपण सुचविलेला हा बदल योग्य आहे.वाचणार्यांनी हा शेर असाच वाचावा.
यायची ती फक्त वचने मज मिळाली
बोलला तो यायचा राहून गेला
ह बा जी,बहर,गंगाधरजी,
खुप खुप धन्यवाद!
अजय अनंत जोशी
सोम, 02/08/2010 - 08:02
Permalink
छान गझल. न्याय मिळला =
छान गझल.
न्याय मिळला = मिळला चे काही करता आले तर पहा.
शुभेच्छा!
निलेश कालुवाला
बुध, 04/08/2010 - 23:11
Permalink
धन्यवाद अजयजी. शेरात 'मिळला'
धन्यवाद अजयजी. शेरात 'मिळला' हा शब्द मलाही खटकत होताच.पण का कोण जाणे मी तो तसाच ठेवला.खरं तर त्याआधी मी हा शेर असा लिहिला होता.
जिंदगी! होते किती झगडे तुझ्याशी?
फैसला लागायचा राहून गेला
अनिल रत्नाकर
सोम, 09/08/2010 - 00:58
Permalink
अप्रतिम गझल तू केली पण सफाई न
अप्रतिम
गझल तू केली पण सफाई न आली
नूर तो गवसायचा राहून गेला
शेर छान पण तो माझ्यासारख्यांसाठी चपखल.
आपली गझलेत नूर आणि सफाई दोण्ही ओतप्रोत.
केदार पाटणकर
सोम, 09/08/2010 - 11:13
Permalink
ढोल बडवायचा राहून गेला... वा,
ढोल बडवायचा राहून गेला...
वा, वा !
एकदम सही शेर!
लिहीत रहा.
निलेश कालुवाला
शनि, 14/08/2010 - 11:48
Permalink
अनिलजी,केदारजी धन्यवाद
अनिलजी,केदारजी
धन्यवाद मनापासून.