माझ्या तुझ्यात काही

माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे
सांगू नये जगाला काही असे असावे

पंचांग म्हणत होते की आजची अमावस
येता समोर तू कां मग चांदणे पडावे?

आडून चौकशी कां होते तुझ्याकडूनी?
प्रस्ताव थेट काही आता पुढ्यात यावे

अफवा कशा पसरल्या गावात जाणतो मी
बघुनी मला तुझे ते क्षण थांबणे असावे

माझ्याच काळजाची ही काय राजनीती?
सोडून पक्ष माझा जाऊन तुज मिळावे

-----------------------------------------
जयन्ता५२

गझल: 

प्रतिसाद

छान. अफवा, चांदणे विशेष.

भन्नाट! चांदणे तर केवळ अप्रतिम!

"अफवा" आवडला...

जयंतराव... झकास!!

माझ्याच काळजाची ही काय राजनीती?
सोडून पक्ष माझा जाऊन तुज मिळावे....सुरेख.

"माझ्याच काळजाची ही काय राजनीती?"
काळीज आणि राजनीती खूपच सुंदर!सुरेख मांडलये.

अफवा चान्दणे सुंदर!

छान. अफवा, चांदणे विशेष.
गझल आवडली.

सर्वांना धन्यवाद!
जयन्ता५२

पुढ्यात, राजनिती मस्तच.

छान. अफवा छान.

फार छान ..............................

सुंदर...चांदणे, अप्रतिम.