कर्जमाफीच्या आमिशावर अशी माजली शेते
कर्जमाफिच्या आमीशावर अशी माजली शेते
पाउस पडला नाहि तरीही पीक भुकेचे येते
कुपोषणाचा अर्थ कळाया उपोषणाला बसली
मातीच्या गर्भात अकाली जन्म जाहली शेते
किती गचकली पाण्यावाचून गणती कोणी केली
संख्या फुगवून सांगत गेले किती वाचली शेते
अनुदानाच्या थापा ऐकुन अता शहाणी झाली
किती कुणाचे टक्के असतील शोध लावती शेते
युगायुगांची कासावीस अशी वळवाने सरते का?
रक्ताचे मग पाणी करुनी आम्हि शिंपली शेते
.........कैलास गांधी
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
शनि, 17/07/2010 - 18:19
Permalink
वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव
वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव दीर्घ लिहावेत, ही विनंती.
चित्तरंजन भट
शनि, 17/07/2010 - 18:30
Permalink
अनुदानाच्या थापा ऐकुन अता
अनुदानाच्या थापा ऐकुन अता शहाणी झाली
किती कुणाचे टक्के असतील शोध लावती शेते
वा. एकंदर छान आणि जोमदार.
कैलास
शनि, 17/07/2010 - 19:11
Permalink
युगायुगांची कासावीस अशी
युगायुगांची कासावीस अशी वळवाने सरते का?
रक्ताचे मग पाणी करुनी आम्हि शिंपली शेते
उत्तम शेर..... चांगली गझल कैलासराव.
अनंतजी ढवळेंच्या '' खिन्न शेते'' ची आठवण या निमित्ताने झाली.
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
शनि, 17/07/2010 - 20:30
Permalink
कर्जमाफिच्या आमीशावर अशी
कर्जमाफिच्या आमीशावर अशी माजली शेते
पाउस पडला नाहि तरीही पीक भुकेचे येते
हा शेर अजिबात नाही कळला. कृपया अर्थ सांगावा.
बाकी चारही शेर आवडलेत.
ह बा
सोम, 19/07/2010 - 12:32
Permalink
युगायुगांची कासावीस अशी
युगायुगांची कासावीस अशी वळवाने सरते का?
रक्ताचे मग पाणी करुनी आम्हि शिंपली शेते
शेर आवडला.
कैलास गांधी
सोम, 19/07/2010 - 16:02
Permalink
वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव
वृत्तानुसार शब्द ऱ्हस्व किंव दीर्घ लिहावेत, ही विनंती नक्कीच पाळेन...
चित्तरंजनजी, कैलासजी, ह बा आणि गंगाधर मुटेजी धन्यवाद.
काही चुका आणि सुधारणा अपेक्षित असेल तर आपले सर्वांचे मार्गदर्शन हवेच आहे ...
कर्जमाफिच्या आमीशावर अशी माजली शेते
पाउस पडला नाहि तरीही पीक भुकेचे येते
या ओळी हा निव्वळ उपहास आहे