गझलेत काय सांगू?

गझलेत काय सांगू?..(सांगायचेच होते!)
होता किती जिव्हाळा! (पण जाच तेच होते!)

कां भेटलो तुला मी?...ते आजही कळेना!
आभास ते म्हणू मी? कि ते खरेच होते?

माझा कधीच नव्हता, ताबा मनावरी ह्या..
ते बंध खेचलेले..सारे तुझेच होते!!

सांगू किती कुणाला..मी काय सोसले ते..
तो भूतकाळ होता... ते ही जुनेच होते!!

आता सुखात बसतो, गाळून आसवांना..
जे मीठ काढले ते..बरणी मधेच होते!!

-- बहर.

गझल: 

प्रतिसाद

गझलेत काय सांगू?..(सांगायचेच होते!)
होता किती जिव्हाळा! (पण जाच तेच होते!)

मतला अल्टीमेट!!!
छान गझल.

माझा कधीच नव्हता, ताबा मनावरी ह्या..
ते बंध खेचलेले..सारे तुझेच होते!!

हा फारच सुरेख.
आवडली गझल.

हबा... गंगाधर.. धन्यवाद.

माझा कधीच नव्हता, ताबा मनावरी ह्या..
ते बंध खेचलेले..सारे तुझेच होते!!

सुदंर...

वा! छानच आहे गझल!