किती सुखाचे असेल

नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे
कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने अधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे,
क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, बधीर होणे

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

गझल: 

प्रतिसाद

क्रांतीजी,
माझ्याकडे या गझलेची स्तुती करायला शब्दच नाहीत...
युवराज सिंगचे सहा षटकार आठवले..... सगळेच शेर वाचताच भावले...
अतिशयोक्ती समजु नका. मी अकारण शब्द वापरत नाही. पहिल्या वाचनानंतर (व्याकरण वगैरे न बघता. ते योग्यच असेल ही खात्री आहे.) उत्स्फुर्तपणे जे वाटलं ते लिहीलं...
शुभेच्छा!

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

वाहवा!!!

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

हासिल-ए-गझल....

भन्नाट रचना... अप्रतिम.

डॉ.कैलास

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

हे शेर अत्युत्तम आहेत.
विलक्षण सुरेख आहे गझल.

धन्यवाद !

ह बा जी,कैलासजी अन ज्ञानेशजी यांचे जे मत आहे तेच माझे.
आणखी काय लिहू ?

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!
वाव्वा. नेहमीप्रमाणे चांगली गझल.

अप्रतिम गझल...
वाह!!!!!
अभिनंदन..
बधीर चे दोन्ही शेर सारखेच ताकदवान आहेत..

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

वा!

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे

ग्रेट!!

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

सूपर्ब!! अजून काहीच बोलणार नाही. जबरदस्त्त्त्त्त्त्त्त्त्त!

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

भन्नाट रचना... अप्रतिम....आणखी काय लिहू ?

अप्रतिम गझल...

नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे
कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने अधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

मस्तच!

अबीर व फकीर हे दोन खूप आवडले

किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!
वा वा
ही ओळ बराच वेळ मनात साठून राहिली आहे