सौदा
फक्त सुखाची किंमत बघून आलो
मी दु:खाशी सौदा करून आलो
उत्तर म्हणजे जबाबदारी असते
म्हणून केवळ प्रश्नच बनून आलो
हळवी वळणे आता विसरत आहे
आज तुझ्याही दारावरून आलो
तूच ठरव मी आवडलो का तुजला?
मी हातांच्या रेषांमधून आलो
आठवणींचा पाउस बरसत होता
अश्रूंमध्ये पुरता भिजून आलो
त्यांच्यापाशी पैसे रग्गड होते
म्हणून त्यांना स्वप्ने विकून आलो
- नचिकेत जोशी
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
गुरु, 15/07/2010 - 00:00
Permalink
उत्तर म्हणजे जबाबदारी
उत्तर म्हणजे जबाबदारी असते
म्हणून केवळ प्रश्नच बनून आलो
हळवी वळणे आता विसरत आहे
आज तुझ्याही दारावरून आलो
त्यांच्यापाशी पैसे रग्गड होते
म्हणून त्यांना स्वप्ने विकून आलो
हे तीनही शेर फार आवडले.
शेवटचा तर अगदी सुरेख !
पुलेशु.
बहर
गुरु, 15/07/2010 - 03:03
Permalink
आनंदयात्री.. काही बदल
आनंदयात्री.. काही बदल सुचवावेसे वाटत होते...ते लिहीलेही होते... पण परत वाचता वाचता वृत्त बरोबर आहे हे कळले! त्यामुळे ते खोडून हे लिहीतोय!!...
अप्रतिम गझल!!
हा हा!!
शुभेच्छा... आणि क्षमस्व.
-- बहर.
ह बा
गुरु, 15/07/2010 - 10:03
Permalink
त्यांच्यापाशी पैसे रग्गड
त्यांच्यापाशी पैसे रग्गड होते
म्हणून त्यांना स्वप्ने विकून आलो
अप्रतिम शेर! गझल छान.
केदार पाटणकर
गुरु, 15/07/2010 - 10:19
Permalink
ज्ञानेशला आवडलेले शेर मलाही
ज्ञानेशला आवडलेले शेर मलाही आवडले.
आनंदयात्री
गुरु, 15/07/2010 - 11:16
Permalink
ज्ञानेशजी, बहर, हबा,
ज्ञानेशजी, बहर, हबा, केदारजी,
धन्यवाद! :)
गंगाधर मुटे
गुरु, 15/07/2010 - 19:41
Permalink
फक्त सुखाची किंमत बघून आलो मी
फक्त सुखाची किंमत बघून आलो
मी दु:खाशी सौदा करून आलो
.
तूच ठरव मी आवडलो का तुजला?
मी हातांच्या रेषांमधून आलो
हे फार आवडले.
निलेश कालुवाला
गुरु, 15/07/2010 - 22:40
Permalink
उत्तर ,हळवी,हातांच्या रेषां,
उत्तर ,हळवी,हातांच्या रेषां, पैसे...सुरेख.
आवडली गझल.
मधुघट
शुक्र, 16/07/2010 - 12:22
Permalink
आहाहा....स्वप्ने विकून आलो!
आहाहा....स्वप्ने विकून आलो! आवडला!
चित्तरंजन भट
शुक्र, 16/07/2010 - 12:33
Permalink
हळवी वळणे आता विसरत आहे आज
हळवी वळणे आता विसरत आहे
आज तुझ्याही दारावरून आलो
वा. सुरवातीला आजही तुझ्या दारावरून आलो असेच वाचले होते.
आनंदयात्री
शुक्र, 16/07/2010 - 19:50
Permalink
गंगाधरजी, मधुघट, चित्तजी,
गंगाधरजी, मधुघट, चित्तजी, निलेश... thanks...
कैलास
शुक्र, 16/07/2010 - 20:38
Permalink
आठवणींचा पाउस बरसत
आठवणींचा पाउस बरसत होता
अश्रूंमध्ये पुरता भिजून आलो
हा एक शेर वगळता सारेच खूप आवडले....... इतर शेरांच्या तुलनेत हा जरा फीका वाटला.
छान गझल.
डॉ.कैलास
आनंदयात्री
शनि, 17/07/2010 - 07:05
Permalink
कैलासजी, एकदम मान्य! आठवणींचा
कैलासजी, एकदम मान्य!
आठवणींचा पाऊस खूप जुना आणि 'तोच तोच' झाला आहे आता... मलाही लिहीताना सहज सुचला म्हणून ठेवला...
धन्यवाद..