कळले मलाच नाही

सुचले कसे मनाला कळले मलाच नाही
स्वरगीत भावनांचे जुळले उगाच नाही

मी मद्य आठवांचे ओठास लावले का
ज्याने असे कुणाला छळले उगाच नाही

येते अशी समोरी म्हणते प्रिया मला ती
विरहात ज्योत झाले जळले उगाच नाही

कैफात आसवांच्या पाऊस चिंब झाला
झुरणे असे जीवाचे गळले उगाच नाही

हे डंखस्पर्श सारे माझ्याच भोवताली
जहरीविषास त्या मी गिळले उगाच नाही

छंदात बांधलेला हा मुक्तशेर माझा
गझलेत शब्द माझे रुळले उगाच नाही
अवधूत

गझल: 

प्रतिसाद

सुंदर गझल अवधुत..... प्रत्येक शेर ओघवता आणि सुरेख.....

फक्त मतला पुन्हा तपास....'' उगाच नाही'' ही रदीफ मतल्यातील पहील्या मिसर्‍यात ''मलाच नाही'' अशी झाली आहे.
रदीफ सगळीकडे समान असावा लागतो.

डॉ. कैलास

छंदात बांधलेला हा मुक्तशेर माझा
गझलेत शब्द माझे रुळले उगाच नाही

हा शेर विशेष आवडला. गझल छानच.

कैफात आसवांच्या पाऊस चिंब झाला
झुरणे असे जीवाचे गळले उगाच नाही ...छान
.
छंदात बांधलेला हा मुक्तशेर माझा
गझलेत शब्द माझे रुळले उगाच नाही...सुरेख

धन्यवाद कैलासजी
मी गझल लिहायला आताशाच सुरुवात केलीय. गझलेची तांत्रिक माहिती मला नव्हती.
आपला प्रतिसाद नक्कीच उत्साह वाढवणारा आहे.
अवधूत

http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi

ही लिंक वाचावी.

डॉ.कैलास

कैफात आसवांच्या पाऊस चिंब झाला
झुरणे असे जीवाचे गळले उगाच नाही
.
हे डंखस्पर्श सारे माझ्याच भोवताली
जहरीविषास त्या मी गिळले उगाच नाही
.
छंदात बांधलेला हा मुक्तशेर माझा
गझलेत शब्द माझे रुळले उगाच नाही

छान. आवडलेत.