एक उदासी खोलीभर..
====================
एक उदासी खोलीभर दरवळत राहते जणू
रक्तामध्ये दु:ख तुझे विरघळत राहते जणू
सौजन्याचा रुमाल घेऊन पुसत राहतो गळा
चारित्र्याची धुतली कॉलर मळत राहते जणू
घरात एकाकी म्हातारी रडत राहते अशी
तुडुंब भरली घागर की डचमळत राहते जणू
एक अनामिक हुरहुर आहे शिल्लक कोठेतरी
शेपुटतुटकी पाल कुणी वळवळत राहते जणू
जुन्या डायर्या कपाटामधे अशा नांदती अता
विस्कटलेल्या त्या वर्षांची चळत राहते जणू
दिसू लागली आहे आयुष्याची तिसरी मिती
पुर्वग्रहांची भिंत उभी कोसळत राहते जणू..
संध्याकाळी चिंतेने ते काळवंडते असे,
माझे दुखणे नभास अवघ्या कळत राहते जणू
कणाकणाने संपत जातो माझा चांगुलपणा
सून कुणाची घरात अपुल्या जळत राहते जणू !
.
.
.
-ज्ञानेश.
=======================
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 14/07/2010 - 17:03
Permalink
संध्याकाळी चिंतेने ते
संध्याकाळी चिंतेने ते काळवंडते असे,
माझे दुखणे नभास अवघ्या कळत राहते जणू
हा शेर अत्त्युत्तम........
का कोण जाणे ज्ञानेश...... गझल मनाला भिडली नाहि........ कदाचित तुझ्या प्रत्येक गझलेस मी,'' कधी विसरुन गेलेले'' च्या मापदंडावर तपासत असेन.असो....
डॉ.कैलास
चित्तरंजन भट
बुध, 14/07/2010 - 23:04
Permalink
गझल फार आवडली ज्ञानेश.
गझल फार आवडली ज्ञानेश. वेगळ्या वळणाची आहे.
बहर
गुरु, 15/07/2010 - 03:08
Permalink
ज्ञानेश... सॉलीडच!! "चळत"
ज्ञानेश...
सॉलीडच!!
"चळत" रहाते जणू... जाम आवडलं रे!!
केदार पाटणकर
गुरु, 15/07/2010 - 10:08
Permalink
जुन्या डाय-या आणि संध्याकाळी
जुन्या डाय-या आणि संध्याकाळी चिंतेने हे दोन शेर आवडले.
ग्रेस यांचीच कविता वाचत असल्याचा भास झाला.
पण ज्ञानेश, नेहमीसारखी भावली नाही गझल.
ह बा
गुरु, 15/07/2010 - 10:13
Permalink
घरात एकाकी म्हातारी रडत राहते
घरात एकाकी म्हातारी रडत राहते अशी
तुडुंब भरली घागर की डचमळत राहते जणू
अल्टी! गझल छानच!
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 15/07/2010 - 13:13
Permalink
एक उदासी खोलीभर दरवळत राहते
एक उदासी खोलीभर दरवळत राहते जणू
रक्तामध्ये दु:ख तुझे विरघळत राहते जणू
- छान
जुन्या डायर्या कपाटामधे अशा नांदती अता
विस्कटलेल्या त्या वर्षांची चळत राहते जणू
- वा...वा...
संध्याकाळी चिंतेने ते काळवंडते असे,
माझे दुखणे नभास अवघ्या कळत राहते जणू
- फार छान
कणाकणाने संपत जातो माझा चांगुलपणा
सून कुणाची घरात अपुल्या जळत राहते जणू !
- सुरेख
वेगळ्या प्रतिमांची जोमदार गझल.
निलेश कालुवाला
गुरु, 15/07/2010 - 18:04
Permalink
प्रत्येक शेर आवडला.कुणा एकाची
प्रत्येक शेर आवडला.कुणा एकाची वेगळा उल्लेख करायची गरजच नाही.
लाजवाब....
हेमंत पुणेकर
गुरु, 15/07/2010 - 21:09
Permalink
ज्ञानेष, सुंदर गझल! मत्ला,
ज्ञानेष,
सुंदर गझल!
मत्ला, एक अनामिक हुरहुर, जुन्या डायर्या आणि संध्याकाळी हे शेर तर खुप छान झाले आहेत. ह्या सर्व शेरां मधल्या उपमा वापरतांना जर तोल गेला - fine balance चुकला तर शेर फसण्याची पूर्ण शक्यता आहे. पण तो तु सांभाळला म्हणून हार्दिक अभिनंदन!
सौजन्याच्या ....शेर मध्ये थोडी स्थूलता-ग्रॉसनेस जास्त वाटते.
मक्त्या मधे पहिल्या ओळीत हळुहळु संपत जाण्याचा भाव आहे तर दुसर्या ओळीत जळत राहण्याचा - continuity चा भाव आहे तेव्हा ते दोन मिसरे हवे तेवढे मॅचिंग वाटत नाही.
उत्तम! अभिनंदन!
मधुघट
शुक्र, 16/07/2010 - 12:19
Permalink
वा वा ज्ञानेश.... खूप वाट
वा वा ज्ञानेश....
खूप वाट पहायला लावून एक दर्जेदार गझल दिलीस.... :-)
एकदम जोरदार....
कणाकणाने संपत जातो माझा चांगुलपणा
सून कुणाची घरात अपुल्या जळत राहते जणू !
सुंदर!!!.
जमीर इब्राहिम
शुक्र, 16/07/2010 - 18:05
Permalink
गोओओओओओल्ल्ल्ल्... पुन्हा
गोओओओओओल्ल्ल्ल्... पुन्हा एकदा.....
पहिले दोन तर जबरदस्तच ......आणि शेवटची ओळ वाचुन काटा आला यार....
फन्टस्टिश्क....!!!!
- जमीर
बहर
शुक्र, 16/07/2010 - 20:15
Permalink
"अळत" वरच्या यती मुळे गझलेचा
"अळत" वरच्या यती मुळे गझलेचा तोल फार सुंदर साधला आहे. वा! पुन्हा वाचली.
वैभव देशमुख
शनि, 17/07/2010 - 10:57
Permalink
घरात एकाकी म्हातारी रडत राहते
घरात एकाकी म्हातारी रडत राहते अशी
तुडुंब भरली घागर की डचमळत राहते जणू
एक अनामिक हुरहुर आहे शिल्लक कोठेतरी
शेपुटतुटकी पाल कुणी वळवळत राहते जणू
कणाकणाने संपत जातो माझा चांगुलपणा
सून कुणाची घरात अपुल्या जळत राहते जणू !
ज्ञानेश
संपुर्ण गझल आवडली...
कैलास गांधी
शनि, 17/07/2010 - 13:11
Permalink
अप्रतिम!!!! कणाकणाने संपत
अप्रतिम!!!!
कणाकणाने संपत जातो माझा चांगुलपणा
सून कुणाची घरात अपुल्या जळत राहते जणू !