जाणिवा विसरून गेलो .....

जाणिवा विसरून गेलो चूक झाली
मी तुला माझा म्हणालो, चूक झाली

राज्य चाले जे तहांच्या बोलण्यांवर
मी तिथे लढण्यास आलो, चूक झाली

पाहिजे होते जया हुजरेच सारे
मी तया शिरजोर झालो, चूक झाली?

का पिल्यावर चांगल्या सुचतात गझला?
मी कधी नाहीच प्यालो, चूक झाली?

शेवटी म्हणशील येऊनी हबा ला
'मी विना लढताच मेलो, चूक झाली'

- ह. बा. शिंदे

गझल: 

प्रतिसाद

लई भारी!!

न पीता इतकी चांगली गझल कशी लिहीलीत हो ह.बा.?

गंमत सोडा... ( सोडा म्हणजे 'सोडण्यातला' सोडा!)

सॉरी... चूक झाली!!!!

गझल भारीच!!

पाहिजे होते जया हुजरेच सारे
मी तया शिरजोर झालो, चूक झाली?

हा फारच आवडला.

राज्य चाले जे तहांच्या बोलण्यांवर
मी तिथे लढण्यास आलो, चूक झाली

चांगला शेर...... मस्त गझल..

डॉ.कैलास

कैलासजी, बहर, गंगाधरजी,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

राज्य चाले जे तहांच्या बोलण्यांवर
मी तिथे लढण्यास आलो, चूक झाली

पाहिजे होते जया हुजरेच सारे
मी तया शिरजोर झालो, चूक झाली?

चांगली गझल.बहुत खुब ह बा जी.

निलेश जी, प्र तिसादाब द्द ल आभारी आहे.
ह. बा.

राज्य चाले जे तहांच्या बोलण्यांवर
मी तिथे लढण्यास आलो, चूक झाली

पाहिजे होते जया हुजरेच सारे
मी तया शिरजोर झालो, चूक झाली?
वा वा... चा॑गली गझल....

धन्यवाद वैभव!

का पिल्यावर चांगल्या सुचतात गझला?
मी कधी नाहीच प्यालो, चूक झाली?

छानच आहे.
काय प्यायचे राहिले हबा?
काहीही न पिता सुदृढ गझला होतायत.काळजी घ्या.
शेरांना चांगले वजन येत आहे. पण ह्या दिवसात नकाच वजन उचलू? (भरल्या ग्लासाचे).

अनिलजी,
नेमका शेर उचललात. असो.
शेरांना चांगले वजन येत आहे. : आभारी आहे.

.....................................................
पण ह्या दिवसात नकाच वजन उचलू? (भरल्या ग्लासाचे). : हा विषय गझलेशी संबधीत नसला तरीही टाळावा असा आजिबात नाही त्यामुळे याविषयी आपण दैव भेटविल तेव्हा मोकळ्या वेळेत सविस्तर बोलू.

राज्य चाले जे तहांच्या बोलण्यांवर
मी तिथे लढण्यास आलो, चूक झाली

पाहिजे होते जया हुजरेच सारे
मी तया शिरजोर झालो, चूक झाली?

दोन्ही शेर सुंदर

का पिल्यावर चांगल्या सुचतात गझला?
मी कधी नाहीच प्यालो, चूक झाली?
वाव्वा.

चित्तरंजनजी?
धन्यवाद!

[संपादित]

योगेशजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

'राज्य चाले' हा शेर आवडला.

धन्यवाद केदारजी.

ह. बा. यांना,

सप्रेम नमस्कार

तुम्ही प्रतिसादांसाठी गझला लिहिता की गझल लिहावीशी वाटते, तो काव्यप्रकार आवडतो म्हणून गझला लिहिता ?
तुम्हाला गझल हा काव्यप्रकार आवडत असावा म्हणून तुम्ही गझल लिहिता, असे मला वाटते. आणि तसे असेल (तसेच असणार) तर ही बाब खूप मोलाची आहे.मी आजवरच्या तुमच्या सर्वच गझला वाचलेल्या आहेत, त्यावरून माझे हे मत बनले आहे. ते चुकीचे नसावे, असे वाटते. तुम्ही सावकाश का होईना प्रगतीच्या दिशेने निघाला आहात. वाटेतील अडथळेच अनेकदा आपला प्रवास गतिमान ठेवत असतात !

गझल सादर केली की प्रतिसाद मिळतात. मिळणारच.
मिळालेल्या प्रतिसादांविषयीचा ऊहापोह आपणच आपला आपल्या मनात करावा. प्रत्येक टीकाकाराला आपला मित्र समजावे. त्यांना टीका करू द्यावी. आपण लिहीत राहावे.

प्रतिसादांमध्ये काही इकडे-काही तिकडे होतच राहणार. कुणाला काही शेर आवडतील. कुणाला आवडणार नाहीत. चांगल्या प्रतिसादांबद्दल कृतज्ञ असावे. टीकेचा सूर काढणाऱया प्रतिसादांबद्दल तटस्थ असावे. टीकात्मक प्रतिसादांमुळे विचलित होऊन जाऊ नये आणि अशा प्रत्येक प्रतिसादासाठी एवढे रक्तही आटवू नये. प्रत्येक प्रतिसादाचा प्रतिवाद करायचा म्हटले तर किती ऊर्जा नष्ट होईल ? ही ऊर्जा वाचवावी. ती उत्तमोत्तम गझला लिहिण्याच्या कामी खर्च करावी.

तुम्हाला मी हे प्रथमच लिहीत आहे. कमी-जास्त झाले असल्यास दुर्लक्ष करावे. गझललेखनाला शुभेच्छा.

प्रदीप कुलकर्णी,

आपण माझ्या गझला वाचलेल्या आहेत आणि माझ्या प्रगतीबद्दल आपण सकारात्मक आहात हे वाचुन आनंद वाटला.
आपला सल्ला मोलाचा आहे. मी सुध्दा बर्‍याचदा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, बर्‍याच वेळा करतोही पण कधी कधी जसं ऑम्लेटचा वास आल्यावर ऑम्लेट खावसं वाटतं तसं अकारण टीकेचा वास आला की भांडावसं वाटतं.
शेवटी ध्येय चांगल्या गझला लिहीणे हेच आहे. आणि टिकाकारांना अभय देणेच हिताचे आहे हे एव्हाना माझ्या लक्षातही आले आहेच.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

कधी कधी जसं ऑम्लेटचा वास आल्यावर ऑम्लेट खावसं वाटतं तसं अकारण टीकेचा वास आला की भांडावसं वाटतं.

- हे टाळता आल्यास टाळण्याचा प्रयत्न जरूर करा.

शेवटी ध्येय चांगल्या गझला लिहीणे हेच आहे.

- अगदी. मला खात्री होतीच. गझललेखनासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा.

आणि टिकाकारांना अभय देणेच हिताचे आहे हे एव्हाना माझ्या लक्षातही आले आहेच.

- टीकाकारांना अभय देणे वेगळे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे वेगळे आणि टीकाकारांनी केलेल्या टीकेकडे तटस्थपणे पाहणे वेगळे. टीकेकडे तटस्थपणे पाहण्यास शिकावे, असे मी सुचविले होते.

- हे टाळता आल्यास टाळण्याचा प्रयत्न जरूर करा.
भांडण टाळण्याचा प्रयत्न जरुर करेन. ऑम्लेट टाळणार नाही. (हलकासा विनोद)
- अगदी. मला खात्री होतीच. गझललेखनासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा.
धन्यवाद!
- टीकाकारांना अभय देणे वेगळे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे वेगळे आणि टीकाकारांनी केलेल्या टीकेकडे तटस्थपणे पाहणे वेगळे. टीकेकडे तटस्थपणे पाहण्यास शिकावे, असे मी सुचविले होते.
तटस्थपणे पाहण्यास शिकेन आणि तटस्थपणे पाहण्यास शिकल्यानंतर तटस्थपणे पाहिन.

राज्य चाले जे तहांच्या बोलण्यांवर
मी तिथे लढण्यास आलो, चूक झाली

चूक मान्य करणे हेच चुकीचं झालय आजकाल. पण आपली चूक.... म्हणजे गझल छान आहे....आवडली... शुभेच्छा!

का पिल्यावर चांगल्या सुचतात गझला?
मी कधी नाहीच प्यालो, चूक झाली?

सुंदर

बापू
कैलास दोघांचाही आभारी आहे.