'' तीळ ''

'' तीळ''

जीव घेणारा तुझ्या ओठांवरी जो तीळ आहे
दोष डोळ्यांचा,फुकाचा काळजाला पीळ आहे.

सप्तरंगी बोलपट तू,वेड तुज सर्वत्र आहे
''मी'' ,कुणी बघणार नाही,तो डब्यातील रीळ आहे

मी मुळी चावट न किंतु,दर्शनी तव कोण जाणे,
का निसटते माझिया ओठांतुनी ही शीळ आहे

मी कसा मिळवू तुला? नवकोट श्रीमंती तुझी अन
मी भिकारी सदन माझे,उंदराचे बीळ आहे.

हा गुलाबी प्रेमज्वर की,पीतज्वर मुळचा तुझा हा?
प्रेम झाले की तुला '' कैलास '' ही कावीळ आहे?

डॉ.कैलास गायकवाड.

गझल: 

प्रतिसाद

वाह...कैलासजी ,अगदी माझ्या (त्या )जमान्यात मला तरंगल्यासारखे झाले.थोडा आठवणींना उजाळा मिळाला.ते वय अजुनही आहे.(तसा इथे वयाचा वगैरे प्रश्न्न नसतो)पण आता विचार्,मते बदलली आहेत.असो.

संपूर्ण गझल आवडली.मतला आणि मक्ता दोन्ही छान निभावलेत.अगदी काळजाला हात घातल्यासारखे......

पुढील लेखनास शुभेच्छा!

ता.क. तुम्ही प्रतिसादामधे आपल्या गझलेची 'तीळ' ची लिंक कशी तयार केली?

का निसटते माझिया ओठांतुनी ही शीळ आहे
..........भन्नाट.
अप्रतिम गझल.
क्या बात है म्हणायच्या आधीच शीळ निसटली.

कैलासजी,

मतला.

मी मुळी चावट न किंतु,दर्शनी तव कोण जाणे,
का निसटते माझिया ओठांतुनी ही शीळ आहे

आणि मक्ता. विषेश आवडले.
गझल सॉलिड गुलाबी!

दुसरी गझल दिसत नाही कुठे?

कैलासजी,

काबिले तारीफ!

आपल्या मागील गझलांच्या तुलनेत ही उजवी वाटली. (हे रसिकाचे वयक्तिक मत आहे. ते शांतपणे मान्य अथवा अमान्य करण्याचा समजुतदार्/मोठेपणा आपल्याकडे आहेच.)
दुसरा शेर संदिग्ध झालाय.

शीळ मात्र भारीच वाजलीये.

दुसरी गझल इथे आहे.

गझल आवडली.

धन्यवाद निलेश.....
लेखनात लिंक तयार करण्यासाठी प्रतिसाद खिडकी वरील ५ वे आयकॉन टीचकावे.... पुढचे स्वयंस्पष्ट आहे.

अनिल्,हबा,गंगाधरजी.... आपले खूप खूप आभार.

डॉ.कैलास

खुपच छान आहे ...

मी कसा मिळवू तुला? नवकोट श्रीमंती तुझी अन
मी भिकारी सदन माझे,उंदराचे बीळ आहे.

त्यातल्या त्यात हा शेर फारच छान आहे

कैलासजी शिळ बाकी छानच आहे.!!!

धन्यवाद नेहा,धन्यवाद हबा.

डॉ.कैलास

अप्रतिम कैलासजी,
आठवणीना आठवेल अशी सुंदर गझल झालीय.
अवधुत

गझल आवडली.

अनिल्,निलेश्,वामन्,कैलास गांधी... आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार.

डॉ.कैलास