तुझ्या आठवांना उजाळाच देतो...
तुझ्या आठवांना उजाळाच देतो..
खरी सावली हा उन्हाळाच देतो!!
हिर्याला खर्या मोल नाही अताशा..
गड्या ये तुल मी खरी 'काच' देतो!
वसन्तातही जोर नाही जुना 'तो'
अता खास ना मोगरा जाच देतो!!
कितीही करा प्रार्थना त्या तरीही..
खर्या वेदना 'तो' अम्हालाच देतो!
कधी दोष माझे मलाही दिसावे...
कसा दोष मी ही कुळालाच देतो!
नको दानवीरा.. तुझ्या वल्गना त्या..
कुणा एक देतो.. कुणा पाच देतो!!
कसा काळ हा काढला काय सांगू?
तुला आसवांचा पुरावाच देतो!!
-- बहर.
गझल:
प्रतिसाद
कैलास
सोम, 05/07/2010 - 17:12
Permalink
कसा काळ हा काढला सान्गु? तुला
कसा काळ हा काढला सान्गु?
तुला आसवान्चा पुरावाच देतो!!
येथे वृत्त गडबडले आहे...... कदाचित आप णांस
कसा काळ हा काढला काय सांगू? असे लिहायचे असेल... असो..
बाकी छान गझल....
तुझ्या आठवा.ना उजाळाच देतो..
खरी सावली हा उन्हाळाच देतो!!
हिर्याला खर्या मोल नाही अताशा..
गड्या ये तुल मी खरी 'काच' देतो!
वसन्तातही जोर नाही जुना 'तो'
अता खास ना मोगरा जाच देतो!!
हे शेर खास आवडले..
डॉ.कैलास
आनंदयात्री
सोम, 05/07/2010 - 22:44
Permalink
सहज (वाटणारी) गझल
सहज (वाटणारी) गझल आहे...
उन्हाळा, काच, जाच आवडले...
बहर
बुध, 07/07/2010 - 00:31
Permalink
कैलासजी.. मूळ गझलेत .. कसा
कैलासजी.. मूळ गझलेत .. कसा काळ हा काढला काय सांगू.. असेच आहे. कदाचित वाचण्यात चूक झाली असावी आपली.
मला इथे अनुस्वार देता येत नाहीये कैलासजी. का कुणास ठाऊक.. पण बरेच प्रयत्न करून अजून अनुस्वार जमला नाही!
कदाचित वॄत्त त्यामुळेच बिघडल्यासारखे वाटत असेल. कॄपया जाणकारान्नी मदत करावी.पुन्हा अनुस्वार!!!
ह बा
मंगळ, 06/07/2010 - 10:17
Permalink
हिर्याला खर्या मोल नाही
हिर्याला खर्या मोल नाही अताशा..
गड्या ये तुल मी खरी 'काच' देतो!
आवडला! छान गझल.
ह बा
मंगळ, 06/07/2010 - 10:19
Permalink
हिर्याला खर्या मोल नाही
हिर्याला खर्या मोल नाही अताशा..
गड्या ये तुल मी खरी 'काच' देतो!
खालच्या ओळीत तुला चे तुल झाले आहे.
ज्ञानेश.
मंगळ, 06/07/2010 - 13:48
Permalink
सुस्वागतम, बहर. तुझ्या
सुस्वागतम, बहर.
तुझ्या आठवांना उजाळाच देतो..
खरी सावली हा उन्हाळाच देतो!!
व्वा. मस्त शेर.
शेवटचा शेर आणि 'काच'ही छान.
पुलेशु.
चित्तरंजन भट
मंगळ, 06/07/2010 - 13:54
Permalink
बहर, सगळेच शेर चांगले झाले
बहर, सगळेच शेर चांगले झाले आहेत. इतके की अलामत भंग झाल्याचेही लक्षात आले नाही. मतला, काच, पुरावाच विशेष. तुमचा लहजा फार सहज आहे. पुढील गझलेसाठी शुभेच्छा!
कैलास
मंगळ, 06/07/2010 - 14:46
Permalink
अक्षर लिहून झाल्यावर शिफ्ट
अक्षर लिहून झाल्यावर शिफ्ट दाबून ''एम'' कळ दाबावी म्हणजे अनुस्वार उमटेल.
डॉ.कैलास
बहर
मंगळ, 06/07/2010 - 19:18
Permalink
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे. चित्तरंजनजी.. अलामत भंग झाल्याचे माझ्याही ल़क्षात आले नव्हते! लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. कैलासजी.. अनुस्वार जमला!! धन्यवाद!
निलेश कालुवाला
मंगळ, 06/07/2010 - 19:38
Permalink
नको दानवीरा.. तुझ्या वल्गना
नको दानवीरा.. तुझ्या वल्गना त्या..
कुणा एक देतो.. कुणा पाच देतो!!......मनाला भावला.
मनोज ठाकूर
गुरु, 08/07/2010 - 16:06
Permalink
कधी दोष माझे मलाही
कधी दोष माझे मलाही दिसावे...
कसा दोष मी ही कुळालाच देतो!
आपली शैली सुंदर आहे, ग़ज़ल छान.
घाईघीने ग़ज़ल वाचून प्रतिसाद देनार्यांपासून सावध असावे ...अर्थात त्यांनी कितीही मनलावुन वाचले तरी ते चूकाशोधनच.
निरर्थक मुद्दे टाळावे.अश्या महानुभावांकडे दुर्लक्ष्य करावे.
शुभेच्छा...
कैलास
बुध, 14/07/2010 - 17:44
Permalink
मनोजजी, आपण मला बोलत आहात हे
मनोजजी,
आपण मला बोलत आहात हे मला कळतेय...... गझल प्रकाशित झाली तेव्हा त्यात
कसा काळ हा काढला सान्गु?
तुला आसवान्चा पुरावाच देतो!!
असेच होते.... ''काय'' टाकायचा राहीला होता..... मी वरील शेर कॉपी-पेस्ट केला आहे.
दुरुस्तिनंतर तो शेर नीट झाला आहे.
बाकी आपल्या सूचना योग्यच आहेत.
डॉ.कैलास
कैलास
बुध, 14/07/2010 - 18:34
Permalink
धन्यवाद अभिजीत. डॉ.कैलास
धन्यवाद अभिजीत.
डॉ.कैलास
बहर
बुध, 14/07/2010 - 18:37
Permalink
मी नवीन लिहीणारा असल्यामुळे
मी नवीन लिहीणारा असल्यामुळे मला स्तुती आणि टिका दोन्हीही तितक्याच वंदनीय आहेत.( देव करो आणि सदैव असेच असो माझ्या बाबतीत.) "कधी दोष माझे मलाही दिसावे!" मनोजजी, कैलासजींच्या अभिप्रायांमधून शिकायला मिळते हे ही तितकेच खरे आहे. आपल्या प्रतिसादाचा मी आदर राखूनच हे बोलतो आहे.
धन्यवाद.
बहर
बुध, 14/07/2010 - 18:37
Permalink
मी नवीन लिहीणारा असल्यामुळे
मी नवीन लिहीणारा असल्यामुळे मला स्तुती आणि टिका दोन्हीही तितक्याच वंदनीय आहेत.( देव करो आणि सदैव असेच असो माझ्या बाबतीत.) "कधी दोष माझे मलाही दिसावे!" मनोजजी, कैलासजींच्या अभिप्रायांमधून शिकायला मिळते हे ही तितकेच खरे आहे. आपल्या प्रतिसादाचा मी आदर राखूनच हे बोलतो आहे.
धन्यवाद.