सरळ वागून ती वागली वाकडी

सरळ वागून ती वागली वाकडी
खरंच नाहीत रे माणसे बापडी

''पाठ आई मज, अजून बाराखडी''
विसरलो मी कुठे आजही ती छडी ?

टणक सगळेच इथले मला भासते(वाटते)
हात ही ,पायही, ह्रुदयही लाकडी

रोज जाती बळी माणसे फुकटची
रोज आतून ही पिळवटे आतडी

काढतील कुठला न कुठला मार्ग ते
लोक आहेत रे हे तसे धडपडी

हे उगाच छळणे ना बरे वाटते
पाहिले की असे सटकते खोपडी

तू अब्रूची नको काळजी ही करु
ती मुळातच असे ऊघडी पाघडी

मीच होतो तुझा,गवसलो जो अता
मी तुझ्या आतली राहिलेली कडी

निलेश कालुवाला.

गझल: 

प्रतिसाद

सरळ वागून ती वागली वाकडी
खरंच नाहीत रे माणसे बापडी
छान!

टणक सगळेच इथले मला भासते(वाटते)
हात ही ,पायही, ह्रुदयही लाकडी
वा!

मीच होतो तुझा,गवसलो जो अता
मी तुझ्या आतली राहिलेली कडी
अप्रतिम!!!
................................
खरंच नाहीत रे माणसे बापडी
या ओळित ल्या 'रं' वर अनुस्वार आहे का? तो दिर्घ समजतात का?

छान निलेश.... चांगली रचना...

@हबा
खरंच या ओळीत र वर जो अनुस्वार आहे... याचाच अर्थ खरंच हा ख.. र...च असा उच्चारायचा आहे..... अन्यथा त्याचा उच्चार '' खर्च'' असाही केला जाईल.... आणी तो लघुच आहे.

डॉ.कैलास

कैलासजी,
ख ... र ... च धन्यवाद!

हे उगाच छळणे ना बरे वाटते
पाहिले की असे सटकते खोपडी

टणक सगळेच इथले मला भासते(वाटते)
हात ही ,पायही, ह्रुदयही लाकडी

हे जास्तच आवडलेत.

बाकी गझल उत्तमच.

वामनजी,ह बा जी,कैलासजी,गंगाधरजी,
आपण अगत्य दिलेल्या प्रतिसाबद्दल मनापासून धन्यवाद!

@वामनजी गझलेत व्याकरणाविषयी कन्फुजन नक्कीच आहे.ते मलाही जाणवत होते.गझलेतल्या सातव्या शेरातील ऊघडी पाघडी यातील (उ)लघू चा मी गुरु(ऊ) केला आहे.याचप्रमाणे आणखी कुठे शंका असल्यास सांगावे.
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.

@कैलासजी,
खरंचचं विश्लेषण आपण खुप छान केलं.मी नुसतं तो लघू आहे इतकं सांगून मोकळा झालो असतो.
नवीन गझल कधी टाकताय्?मी वाट पाहतोय....

माझ्या गझलेसंबंधी उत्सुकता आहे हे ऐकून बरे वाटले निलेश....... ही माझी नवीन गझल '' तीळ ''.

डॉ.कैलास