वेदना
कोती असे वेदना कोनाड्यातली
लोभी असे वेदना हो माझ्यातली
ना अर्थ कोलाहलाला मौनात तू
मेलीच संवेदना बोभाट्यातली
स्पर्शेच आकाश माती वा-यातली
का वाहतो वेदना तो नात्यातली?
ना लागतो ठाव हा ऊंची गाठुनी
वाजे वृथा वेदना झोपाळ्यातली
का मारशी तीर जहरी पाठीवरी?
कुरवाळतो वेदना तो भात्यातली
जा, द्ळु नको, गोष्ट आज चव्हाट्यातली
पिसलीच ती वेदना हो जात्यातली
बेभान झाली पिढीच निराशेत ती
जिद्दी असे वेदना पोवाड्यातली
काडी जरी मी असेच खराट्यातली
वाहे अनिल वेदना सोसाट्यातली
...........
रंगात ते खेळ काळे आयुष्यभर
ही रातच सफेद ना घोटाळ्यातली
का बाळगू ह्या व्यथांना पोटात मी?
फांदीस त्या वेदना हो काट्यातली
गझल:
प्रतिसाद
ह बा
शुक्र, 02/07/2010 - 17:07
Permalink
ना अर्थ कोलाहलाला मौनात
ना अर्थ कोलाहलाला मौनात तू
मेलीच संवेदना बोभाट्यातली
छान शेर!!!
आनंदयात्री
शुक्र, 02/07/2010 - 22:05
Permalink
hmm...मलाही यति सापडला
hmm...मलाही यति सापडला नाही... कोणत्या लयीत वाचावे ते कळले नाही...
२-३ शेर म्हणून पाहिले, पण नाही जमले..
अनिल रत्नाकर
शुक्र, 02/07/2010 - 23:42
Permalink
माफ करा, कोनाड्यातली,
माफ करा,
कोनाड्यातली, बोभाट्यातली ई.वाचायला कठीणच आहे,
गंगाधर मुटे
शनि, 03/07/2010 - 21:25
Permalink
ना अर्थ कोलाहलाला मौनात
ना अर्थ कोलाहलाला मौनात तू
मेलीच संवेदना बोभाट्यातली
का मारशी तीर जहरी पाठीवरी?
कुरवाळतो वेदना तो भात्यातली
आशय छान. आवडला.
अनिल रत्नाकर
रवि, 04/07/2010 - 07:29
Permalink
धन्यवाद, गंगाधरजी. यति अजुन
धन्यवाद, गंगाधरजी.
यति अजुन साधत नाही. अवघड शब्द , जोड शब्द, मोठे शब्द गझलमध्ये सहसा वापरण्याचे टाळलेले दिसते, ते वापरुन यति आणि लय कशी साधायची याचा आता मला अभ्यास करावा लागेल. प्रत्येक गझल ही गाता आलीच पाहिजे, हे मला माहित नव्हते. यापुढची गझल चांगली, शिस्तीत, लयीत, होईल असा नक्कीच प्रयत्न करावा लागेल.
अजुन डोळ्यात पाणी आणेल एव्हढी परिणामकारक गझल, मला जमत नाही.
हृदयद्रावक गझलसंग्रहाची जर माहीती असेल तर कृपया मला द्यावी.
धन्यवाद.
आनंदयात्री
सोम, 05/07/2010 - 23:08
Permalink
>>>>>> प्रत्येक गझल ही गाता
>>>>>> प्रत्येक गझल ही गाता आलीच पाहिजे, हे मला माहित नव्हते.
हे मलाही माहित नव्हते!!
बहर
मंगळ, 06/07/2010 - 02:52
Permalink
अनिलजी... प्रत्येक गझल गाता
अनिलजी... प्रत्येक गझल गाता आलीच पाहिजे असा मला वाटत नियम नाही. पण प्रत्येक गझल 'तालात' म्हणता यावी असा माझा स्वतःचा प्रयत्न असतो. तुम्हीही तसेच करून पहावे असे मला वाटते. म्हणजे वॄत्त सहज जमते.
ह बा
मंगळ, 06/07/2010 - 10:14
Permalink
प्रत्येक गझल ही गाता आलीच
प्रत्येक गझल ही गाता आलीच पाहिजे, हे मला माहित नव्हते....
मला वाटलेलं की लयीत वाचता येणे आणि गाता येणे यात फरक असतो.
आणि 'गाता आलीच पाहिजे' हे सत्य असेल तर माझी एकही गझल गाता येत नाही (पण लयीत वाचता येतात बरका). म्हणजे त्या डावातुन कटापच म्हणाव्या लागतील. अ
ज्ञानात भर टाकल्याबद्दल आभारी आहे.