तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा
तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा
सुखी जातीत होते ते, सुखी जातीत ते आता
तुझ्या जोडीस घे तिजला अता घनघाव घालूदे
जिच्या नाजूक हाताने जगाचा चालला भाता
बलात्कारी, खुनी की दंगली घडवून बनलेला
पुजेला कोणता नेता हवा रे पंढरीनाथा?
कधी ना वाटले मुकलो भुईला जन्म देणार्या
जिथे मी टेकला माथा तिथे ती भेटली माता
परीक्षा घेउनी तर भेटीला येतोस की देवा
करावी सावकारी तू म्हणावे मी तुला दाता?
- ह. बा. शिंदे
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 30/06/2010 - 18:38
Permalink
वा हणमंत राव....... वृत्त
वा हणमंत राव.......
वृत्त हाताळणी,आशय, ... फार छान....
बलात्कारी, खुनी की दंगली घडवून बनलेला
पुजेला कोणता नेता हवा रे पंढरीनाथा?
हा शेर विशेष आवडला......
बेफिकिर यांच्या गझलेस आलेला केदार पाटणकर यांचा नुकताच एक प्रतिसाद वाचला..... ज्यात बेफिकिर हे नव्या पीढीचे शेर लिहितात असा गौरवोद्गार त्यांनी काधला आहे....... मला वाटते नव्या पीढीचे आणी कुणाची शैली नसलेले....... आय मीन स्वताची एक शैली असलेले शायर म्हणून हबांचा त्यात समावेश व्हावा.....
छान गझल हबा..... वियद्गंगेची उत्तम हाताळणी.....
लगे रहो..
डॉ.कैलास
ह बा
गुरु, 01/07/2010 - 10:25
Permalink
वामनकाका, प्रतिसादाबद्दल
वामनकाका,
प्रतिसादाबद्दल आभारीच आहे.
(किती पटापट गझला होताहेत तुला. एखाद्याला वाटायचं कामगार लाउन गझला लिहीतोयस)
साधारणतः किती दिवसांनंतर नवी गझल व्हावी? स्ट्यांडर्ड टायमिंग सांगावे.
कैलासजी,
@कुणाची शैली नसलेले....... आय मीन स्वताची एक शैली असलेले शायर म्हणून हबां....@
गुदगुल्याच गुदगुल्या!!!
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
गंगाधर मुटे
गुरु, 01/07/2010 - 20:58
Permalink
बलात्कारी, खुनी की दंगली
बलात्कारी, खुनी की दंगली घडवून बनलेला
पुजेला कोणता नेता हवा रे पंढरीनाथा?
हा शेर विशेष आवडला......
आनंदयात्री
गुरु, 01/07/2010 - 23:17
Permalink
गझल आवडली...
गझल आवडली...
ह बा
शुक्र, 02/07/2010 - 13:35
Permalink
गंगाधरजी, आनंदयात्रीजी, प्रति
गंगाधरजी,
आनंदयात्रीजी,
प्रतिसादाबद्दल आभार!!!
निलेश कालुवाला
शुक्र, 02/07/2010 - 22:08
Permalink
ह बा जी, वा.वेगळ्या धाटणीची
ह बा जी,
वा.वेगळ्या धाटणीची गझल.सारीच आवडली.
दुसर्या शेरातला घनघाव लिहिताना चुक झाली आहे असे वाटते.
ख्ररा शब्द -घणघाव.
ह बा
शनि, 03/07/2010 - 10:17
Permalink
निलेशजी, प्रतिसादाबद्दल
निलेशजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
: दुसर्या शेरातील घनघाव : - घणघाव असा वाचावा.
लक्षात आणुन दिल्याबद्दल आभारी आहे.
बहर
बुध, 07/07/2010 - 03:15
Permalink
हणमंतराव... सगळी गझलच भयंकर
हणमंतराव... सगळी गझलच भयंकर आवडली!!!
हणमंतराव....... जय बजरंगबली!!!!
अजून काय बोलू? सहीच!!!
ह बा
बुध, 07/07/2010 - 10:21
Permalink
बहर, तेरी जयजयकार से हम
बहर,
तेरी जयजयकार से हम प्रसन्न हुए... बहर, तु गझलकारोंकी सेना मे आया है तो इस गझल राज्य मे तुझे हर वो फल मिलेगा जो तु चाहेगा.... ये हमारा आशिर्वाद है....कीप इट अप!!! जय श्रीराम!!!
बहर
सोम, 12/07/2010 - 03:44
Permalink
आपका आशिर्वादही काफी हैं
आपका आशिर्वादही काफी हैं प्रभू!! जय रामजी की!!