बंद दिवसाच्या घराचे दार ...

बंद दिवसाच्या घराचे दार होताना
रोज आठवतो तुला अंधार होताना

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना

सोडले तू बाण आणिक चालती झाली
पाहिले नाही जिवाच्या पार होताना

सोसले होते कसे तू एवढे ओझे
कोलमडलो मी तुझा आधार होताना

आज खळखळले जरा ओठावरी हासू
पाहिले नाही असे मी फार होताना

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

वैभव, सुरेख गझल! सगळेच शेर आवडले. फारफार.

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना

सोसले होते कसे तू एवढे ओझे
कोलमडलो मी तुझा आधार होताना

आज खळखळले जरा ओठावरी हासू
पाहिले नाही असे मी फार होताना

हे तर विशेषच.

व्वा व्वा वैभ्या.
मागे काही शेर एेकवले होतेस मित्रा.
बहोतही अच्छा.
सोसले होते कसे तू एवढे ओझे
कोलमडलो मी तुझा आधार होताना
या शेरात डुंबत रहावेसं वाटतेय अरे.
ब॑द दिवसाच्या घराचे दार होताना
रोज आठवतो तुला अ॑धार होताना

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना

फारच छान.

ब॑द दिवसाच्या घराचे दार होताना
रोज आठवतो तुला अ॑धार होताना

सुरेख.
दिवसाच्या घराचे दार...छान कल्पना.

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना
सुंदर.

सोसले होते कसे तू एवढे ओझे
कोलमडलो मी तुझा आधार होताना
छान

आज खळखळले जरा ओठावरी हासू
पाहिले नाही असे मी फार होताना
मस्त

साधी, सोपी तरीही (किंबहुना साधी, सोपी असल्यामुळेच !) परिणामकारक गझल. साध्या शब्दांची ताकद दाखवून देणारी गझल.
पुढील लेखनाला मनापासून शुभेच्छा आणि नव्या गझलेच्या प्रतीक्षेत.

[आशयाला अजिबात धक्का न लागता काही शेर (उदाहरणार्थ - हिरवेगार, आधार) अधिक सौष्ठवपू्र्ण होऊ शकले असते.]

चित्तुजी, प्रणव आणि प्रदीपजी प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद....

मतलाही उत्तम आहे हे सांगायचे राहिलेच. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि अभिनंदन.

सगळे शेर आवडले..... हिरवेगार... आधार छानच.

डॉ.कैलास

सुंदर गझल....
वाह!!!

सोडले(स) तू बाण आणिक चालती झाली(स) असे प्रश्न पडू देऊ नयेत असं मला वाटतं...
आणि इतकी सुंदर गझलेसाठी या छोट्या कारणामुळे "अर्रर्रर्रर्र" असा उद्गार येतो मग!

ग्रेट! मनापासुन सलाम.

आवडलेले शेर :

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना

सोडले तू बाण आणिक चालती झाली
पाहिले नाही जिवाच्या पार होताना

गझल छानच.

प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद....

सोसले होते कसे तू एवढे ओझे
---- इतर सर्व शेरांप्रमाणे हा शेरही आवडला !
क्या कहने!
जयन्ता५२

आन॑दयात्री
सोडले(स) तू बाण आणिक चालती झाली(स) असे प्रश्न पडू देऊ नयेत असं मला वाटतं...

निरर्थक मुद्यावर चर्चा करू नये अस॑ मला वाटत...

निरर्थक मुद्यावर चर्चा करू नये अस॑ मला वाटत...
वैभवशी एकदम सहमत.

http://www.sureshbhat.in/node/2110

ही चर्चा निरर्थक नाही..... आपले लेखन अशाच सूचनांनी सुधारत असते.....वरील धाग्यात सुद्धा अशीच चर्चा मधुघट्,चित्त जी यांनी केलेली आहे....

असा कंटाळलो होतो तशा त्या त्या तराण्यांनी
दिल्या छेडून तारा तू पुन्हा झंकारला गेलो

मा झ्या या शेरावर '' दिल्यास तू छेडून'' असे असायला हवे अशा अर्थाचे प्रतिसाद आले होते....
आणी ते योग्यच आहे.......

आपण चांगले लिहीता... आणि आपले लेखन '' निर्दोष '' व्हावे या सदिच्छेने आनंदयात्री यांनी असा प्रतिसाद दिला आहे.... त्यास निरर्थक म्हणणे मला तरि योग्य वाटत नाही.

डॉ.कैलास

ग्रेट !!!

वैभवराव, काय अप्रतिम लिहिता तुम्ही !
अतिशय सुंदर गझल.

सोबती होतीस माझ्या तू उन्हाळाभर
पण अता नाहीस हिरवेगार होताना

व्वा !

कैलास
ही चर्चा निरर्थक नाही..... आपले लेखन अशाच सूचनांनी सुधारत असते.....

..मी एकूण चर्चेबद्दल बोललेलो नाही. उचललेल्या मुद्द्याबद्दल बोललो आहे.
..अशा सुचना॑नी कुणाचेच भले झालेले नाही.

नेहमीप्रमाणे तंत्र, व्याकरण आणि शब्द यावरचाच मुद्दा छेडला गेला आहे. मूळ मुद्द्यापेक्षा म्हणजे गझलेपेक्षा किंवा
त्यातल्या आशयापेक्षा इतर मुद्द्यांचा कीस पाडणे हे काही नवे नाही. असो. असो.
मुळात हे संकेतस्थळ म्हणजे काही गझल शिकवण्याची कार्यशाळा किंवा मार्गदर्शन केंद्र नाही, असे वाटते. लेखन अधिक निर्दोष व्हावे म्हणून उघडलेले रेसिपीचे क्लासेससारखे वर्ग नाहीत. जिथे छान छान सुंदर दिसणारे केक किंवा पदार्थ कसे तयार करावेत हे शिकवले जाते.
..
मुळात कविता किंवा साहित्याला व्याकरण किंवा इतर लॉजिकल गृहितकं लागू होत नाहीत. तसे करू नये, कारण तिथे कलावंताचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. आशय सांगण्यासाठी शेवटी व्याकरण भाषा हे साध्य नाही साधन आहे .
असो पुन्हा यावर चर्चा होईलच... असो.
....
वैभव,
आगे बढो.
(मौनं सर्वार्थ साधनम्।)

सुंदर गझल.

>>> मी एकूण चर्चेबद्दल बोललेलो नाही. उचललेल्या मुद्द्याबद्दल बोललो आहे.
श्री वैभव देशमुख - आपल्याला कसले मुद्दे निरर्थक वाटतात याबद्दलची आपली निवड समजली..
खरं तर या तंत्राबद्दलच्या चर्चांपासून मी कायम दूर राहिलेलो आहे, हे आपल्यालाही दिसले असेल.. पण ही सुंदर गझल वाचलेल्यानंतर जी गोष्ट लगेच लक्षात आली, ती लिहिली.. मी व्यक्त केलेल्या मतावर ठाम आहेच..
शेवटी ज्याला जे आवडतं ते त्याने घ्यावं... गझलेचं तंत्र महत्त्वाचं की आशय यासारख्या विषयांत प्रतिक्रीयांवर प्रतिक्रीया देऊन आपलाच मुद्दा सिद्ध करण्याची माझी इच्छा नाही आणि तेवढा वेळही नाही, त्यापेक्षा त्या वेळात चांगल्या गझला वाचायला आवडतील.
धन्यवाद!!

कैलासजी, प्रणवजी, वैभवजी-
माझ्यापुरता हा विषय इथे संपवतो आहे...
धन्यवाद...

बंद दिवसाच्या घराचे दार होताना
रोज आठवतो तुला अंधार होताना

बंद दिवसाचे घर, आणि त्याचे दार.......कातरवेळ अशी करकरताना...सॉलिड कल्पना.
संपुर्ण गझलच सहजसुंदर.

सशक्त मराठी ग़ज़ल = वैभव

प्रतिसादाबद्दल [ मनोज ठाकूर सोडून ] सर्वा॑चे धन्यवाद.......

चांगली रचना.

वेंधळेपणामुळे असेल किंवा खरेच घाईत... इतकी चांगली गझल वाचायची राहून गेली!! खरंच उत्तम गझल झाली आहे. वा! एकही शेर नमूद करता येत नाही..कारण सगळेच खूपच आवडलेत! काय करू?

सोडले तू बाण आणिक चालती झाली
पाहिले नाही जिवाच्या पार होताना

सोसले होते कसे तू एवढे ओझे
कोलमडलो मी तुझा आधार होताना

वा, सुरेख

आज खळखळले जरा ओठावरी हासू
पाहिले नाही असे मी फार होताना

हा शेर खूपच आवडला

आज खळखळले जरा ओठावरी हासू
पाहिले नाही असे मी फार होताना

वा वा

अख्खी गझल सुंदर