गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...
आल्या तुला अताशा वाटून या सरी
माझ्या कवेत होत्या दाटून या सरी
येईन बोललेला झाडास थेंब तो
नेल्या कुणी नभीच्या लाटून या सरी
त्यांचेच ते बरसणे, त्यांचाच अंतही
का हासल्या तरीही फाटून या सरी
तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...
दावू नका ह. बा. ला ही ओल बेगडी
घर राहतात त्याचे थाटून या सरी
-ह. बा. शिंदे
गझल:
प्रतिसाद
कैलास
बुध, 16/06/2010 - 21:02
Permalink
येईन बोललेला झाडास थेंब
येईन बोललेला झाडास थेंब तो
नेल्या कुणी नभीच्या लाटून या सरी
हा शेर आवडला.....छान गझल.
डो.कैलास
निलेश कालुवाला
गुरु, 17/06/2010 - 08:40
Permalink
तू वाट पाहिली पण ना भेटल्या
तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...
दावू नका ह. बा. ला ही ओल बेगडी
घर राहतात त्याचे थाटून या सरी
ह.बा.जी ऐन पावसाळ्यातली ही गझल...फारच छान.आपल्या या गझलेत मी काही आणखी व्दिपदींची भर घालू इच्छितो.....अर्थात काफियात थोडा बदल करुन.
होती तहानलेली सारीच माणसे
आल्यात नेमक्या बघ धावून या सरी
मी वाट पाहताही आल्याच ना पुन्हा
गेल्या कुठे दिवाण्या होवून या सरी
ह बा
मंगळ, 22/06/2010 - 11:48
Permalink
@कैलासजी, (मार्गदर्शनानुसार
@कैलासजी,
(मार्गदर्शनानुसार शेवटच्या शेरात नाव घातले आहे. योग्य वाटते आहे का?)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@निलेशजी,
आपले दोन्ही शेर उत्तम आहेत..... अर्थात काफिया सांभाळून आले असते तर आणखी मजा आली असती.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
क्रुप या
तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...
हा शेर
तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात चातका रे बाटून या सरी...
असा वाचावा.
कैलास
गुरु, 17/06/2010 - 12:16
Permalink
हबा..... मक्ता छानच आहे.
हबा.....
मक्ता छानच आहे.
ह बा
शनि, 19/06/2010 - 15:40
Permalink
@तू वाट पाहिली पण ना भेटल्या
@तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...
बरा वाटला. बाकी सगळी जुळवा जुळवी. माझे मत. अधिकार आहे म्हणून बोल तो, बाकी तू विचार कर.@
वामनजी,
एक शेर बरा वाटला हे आमचे भाग्य. बाकी जुळवा जुळवी वाटते आहे का नाही यावर विचार करतो.
अधिकार आहे म्हणून बोलतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. आप बात करोगे तोही हमारी बात बनेगी.
ह बा
सोम, 21/06/2010 - 10:20
Permalink
अनंतजी, विचारांना त्यांचा
अनंतजी,
विचारांना त्यांचा आकृतीबंध ठरवू दिला पाहिजे...या उलट नको : )
आपण असेच करतो असा माझा विश्वास आहे. पण आपण सांगता आहात तर पुन्हा एकदा विचार करतो.
आपल्या मताचा आदर आहेच.
कैलास
सोम, 21/06/2010 - 21:49
Permalink
अनंतजींशी बराच सहमत
अनंतजींशी बराच सहमत आहे....... अनिल रत्नाकर आणि तदनंतर हबा बाबत हाच अनुभव येत आहे.......
गझलेचा आकॄतीबंध्,बाराखडी,अलामत आदि चोख पाळण्यात आशय अन उत्स्फुर्तता याबाबत कुठेतरी तडजोड होतेय असे दिसतेय..... असो.... हबा... आपल्याकडून अजून उत्तमोत्तम अपेक्षित आहे.... पुलेशु.
डॉ.कैलास
ह बा
मंगळ, 22/06/2010 - 10:12
Permalink
कैलासजी, आपले मत/मार्गदर्शन
कैलासजी,
आपले मत/मार्गदर्शन मोलाचे आहे. फक्त याच गझलेबाबत हे मत आहे की सर्वच ते सांगावे. (मते बदलू शकतात्/बदलतात/बदलायलाच हवीत) बाकी मी चांगले लिहीण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आपल्या दर्जेदार गझला वाचतो आहेच.
धन्यवाद!
कैलास
मंगळ, 22/06/2010 - 11:33
Permalink
वामन राव , मला उपरोक्त शेर
वामन राव ,
मला उपरोक्त शेर आवडलाय हे खरे आहे..... पूर्ण गझलेत या शेरात नाविन्य,आशय आदि बाबत सरस आहे...... इतर शेर गझलेच्या आकॄतीबंधात आहेत.... पण उत्सफूर्तता दिसत नाही......माझे मत बदलले नाही..... गझल आवडली हेहि तितकेच खरे आहे.
डॉ.कैलास
ज्ञानेश.
मंगळ, 22/06/2010 - 12:18
Permalink
तू वाट पाहिली पण ना भेटल्या
तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...
हबा, गडबड आहे.
'सरींची' वाट पाहणारा तो काल्पनिक पक्षी चातक असतो, चकोर नाही. चकोर पक्षी चांदण्याचा भुकेला असतो.
ह बा
मंगळ, 22/06/2010 - 11:43
Permalink
ऑल राइट कैलासजी. गझलेच्या
ऑल राइट कैलासजी. गझलेच्या क्षेत्रात मी आपणास ज्युनियर आहे. आपण योग्य ते दाखवून देणे माझ्यासाठी गरजेचे आहे. मी कधिही स्वत:वर लिहीण्याची जबरदस्ती करत नाही. तरीही आपल्याला किंवा अनंतजीना क्रुत्रीमता जाणवली म्हणजे काहि तरी दोष असेलच. विचार करतो आहेच. वाचन चालू आहेच.
धन्यवाद!
ह बा
मंगळ, 22/06/2010 - 11:52
Permalink
तू वाट पाहिली पण ना भेटल्या
तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात रे चकोरा बाटून या सरी...
हा शेर
असा वाचावा:
तू वाट पाहिली पण ना भेटल्या तुला
गेल्यात चातका रे बाटून या सरी...
'सरींची' वाट पाहणारा तो काल्पनिक पक्षी चातक असतो, चकोर नाही.
चूक झाली होती. ज्ञानेशजी खूप धन्यवाद!
भूषण कटककर
मंगळ, 22/06/2010 - 23:13
Permalink
यमकानुसारी रचना! होते म्हणा!
यमकानुसारी रचना! होते म्हणा!
ह बा
बुध, 23/06/2010 - 10:40
Permalink
भूषणजी, प्रतिसादाबद्दल
भूषणजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!