झेलू

आणलेला आव झेलू
झूट सारे डाव झेलू

दूर जाती आप्त आता
वादळी हे घाव झेलू

अर्थ नाही वागण्याला
ठेवले ते नाव झेलू

का पळू मी लांब आता?
राहिलो ते गाव झेलू

लागलो मी ढासळाया
आजचा तो भाव झेलू

गझल: 

प्रतिसाद

का पळू मी लांब आता?
राहिलो ते गाव झेलू
हा शेर समजला. छान वाटले.

छान गझल अनिल.... आवडली.

डॉ.कैलास

कैलासजी धन्यवाद,
मला माहित आहे मी अत्यंत किरकोळ लिखाण करित आहे. पण मात्रेत, व्रुत्तात चूक होऊ न देणे हा माझा पहिला ऊद्देश आहे. 'बाराखडीचा अभ्यास करा' ही प्रतिक्रीया पचवणे फार जड असते अगदी बालवाडीत बसल्यासारखे वाटते.
give me some time, i want to grow up once again.

दूर जाती आप्त आता
वादळी हे घाव झेलू

अनिल गझल खरंच आवडली.... मात्र तुम्च्या प्रतिक्रियेनंतर ..... अन तुम्च्या वरील शेरानंतर असे लिहवेसे वाटले...

वादळी या वादळा च्या वादळातुन वादळे उठतील आता..........

पुलेशु.

डॉ.कैलास

वादळी या वादळा च्या वादळातुन वादळे उठतील आता.

अनिलचे वादळ व्हावे
की कोमल झुळुक व्हावे
आणि हळुवार स्पर्शावे

पण अडथळ्यानी सांभाळावे
मज उमगतील जगाचे कावे
वाटते,
अनिल नको मग कैलास व्हावे

अनिलचे वादळ व्हावे
की कोमल झुळुक व्हावे
आणि हळुवार स्पर्शावे

पण अडथळ्यानी सांभाळावे
मज उमगतील जगाचे कावे
वाटते,
अनिल नको मग कैलास व्हावे

वा वा!!! हे म्हणजे केवळ अप्रतिमच!!! आपण छान लिहीता अनिलजी.