काय झाले जरी गेला तडा

काय झाले जरी गेला तडा
जीवनाचा रिता होता घडा

जिंदगीची छडी तुटली तरी
मी न शिकलो कधी कुठला धडा

सोसवेना अशी ही शांतता
प्रश्न आता नवा व्हावा खडा

मी मनाशी जरासा हासलो
ते म्हणाले "अरे, लावा छडा"

संपली ती कहाणी या इथे
उंच आहे पुरेसा हा कडा!

स्वर्ग त्याला पसंतीचा मिळे
तो इथे अन् 'तिथे' होता बडा!

भाग्य माझे कसे उजळायचे?
एक बोटातला चुकला खडा

प्राजक्ताने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा

---------------------------------------------
जयन्ता५२

गझल: 

प्रतिसाद

काय झाले जरी गेला तडा
जीवनाचा रिता होता घडा

-छान

जिंदगीची छडी तुटली तरी
मी न शिकलो कधी कुठला धडा

- वा वा

सोसवेना अशी ही शांतता
प्रश्न आता नवा व्हावा खडा

- मस्त

संपली ती कहाणी या इथे
उंच आहे पुरेसा हा कडा!

- सु रे ख. दोन ओळींत काय काय सामावले जाऊ शकत नाही!

प्राजक्ताने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा

- वृत्तात गडबड. इथे ' ज ' गुरू (दोन मात्रा) होईल.

एकंदर गझल आवडली.

भाग्य माझे कसे उजळायचे?
एक बोटातला चुकला खडा

सही!

जिंदगीची छडी तुटली तरी
मी न शिकलो कधी कुठला धडा

हा शेर खूप आवडला..
एकंदर छान गझल.

डॉ.कैलास

जयंता,
मस्त. आवडली. व्वा.
काय झाले जरी गेला तडा
जीवनाचा रिता होता घडा

जिंदगीची छडी तुटली तरी
मी न शिकलो कधी कुठला धडा

सोसवेना अशी ही शांतता
प्रश्न आता नवा व्हावा खडा

संपली ती कहाणी या इथे
उंच आहे पुरेसा हा कडा!
हे शेर आवडले.

जिंदगीची छडी तुटली तरी
मी न शिकलो कधी कुठला धडा
छान!
सोसवेना अशी ही शांतता
प्रश्न आता नवा व्हावा खडा
सुंदर!!!

गझल आवडली.
मतला आणि
सोसवेना अशी ही शांतता
प्रश्न आता नवा व्हावा खडा

हे दोन शेर जास्त आवडले.

गझल आवडली.
(वृत्तात गडबड. इथे ' ज ' गुरू (दोन मात्रा) होईल.)
हे अभ्यास करण्यायोग्य.
मागे माझ्या एका गझलमध्ये ' कर्तव्याला' असा शब्द वापरला होता. तेथेही क बरोबर व्या मुळे र्त ही दीर्घ होत होता.
चूका काढणे हा ऊद्देश नाही. तेव्हढी माझी कुवत नाही. पण शिकण्यासाठी म्हणून ही प्रतिक्रीया.

प्राजक्ताने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा

हा शेर कृपया

मोगर्‍याने तगादे लावले
केवढा तो महागाचा सडा
असा वाचावा!

सर्व प्रतिसादींना धन्यवाद.
जयन्ता५२