...घट एकांतात झरावा !

.......................................................
...घट एकांतात झरावा !
.......................................................

सोईने ज्याने-त्याने जगण्याचा पट पसरावा !
दिवसाची रात्र करावी; रात्रीचा दिवस करावा !

कोणाच्या आठवणींनी डबडबती माझे डोळे... ?
आईचे दुःख दिसावे ! बापाचा त्रास स्मरावा !

जिंकावे दोघांपैकी कोणीही; हरकत नाही...
माझी अट इतकी आहे, खेळाला रंग भरावा !

मी माझ्या सोबत आहे अन् आगे-मागेसुद्धा...
मी माझी साथ करावी; मी माझा हात धरावा !

टीकारामांनी घेता कवितेची अग्निपरीक्षा....
शब्दांचे हीन जळावे...अर्थांचा गंध उरावा !

इच्छा ही एकच माझी शेवटची आहे आता...
मृत्यूने येण्याआधी माझा हा जन्म सरावा !

गाण्याने निःशब्दाच्या मन माझे चिंब भिजावे...
मौनाच्या संगीताचा घट एकांतात झरावा !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

कोणाच्या आठवणींनी डबडबती माझे डोळे... ?
आईचे दुःख दिसावे ! बापाचा त्रास स्मरावा !

क्या बात है!! अत्यंत सुरेख गझल. क्या बात है. सगळेच शेर फार आवडले.

भावलेली ओळ :
मौनाच्या संगीताचा घट एकांतात झरावा !

आवडलेले शेर :

सोईने ज्याने-त्याने जगण्याचा पट पसरावा !
दिवसाची रात्र करावी; रात्रीचा दिवस करावा !

टीकारामांनी घेता कवितेची अग्निपरीक्षा....
शब्दांचे हीन जळावे...अर्थांचा गंध उरावा !

सुरेख गझल!!!

खेळाला रंग भरावा, अर्थाचा गंध उरावा हे शेर आवडले.

आई व वडील हा शेर नेमका लक्षात आला नाही.

धन्यवाद व अभिनंदन!

कोणाच्या आठवणींनी डबडबती माझे डोळे... ?
आईचे दुःख दिसावे ! बापाचा त्रास स्मरावा !

अप्रतिम !

प्रदीप,
कोणाच्या आठवणींनी, एकांताचा घट फार आवडले,
नेहमी प्रमाणे सुरेख गझल आवडली.

प्रदीपजी,
आवडली.
..
कोणाच्या आठवणींनी डबडबती माझे डोळे... ?
आईचे दुःख दिसावे ! बापाचा त्रास स्मरावा !

अप्रतिम.

शब्दांचे हीन जळावे...अर्थांचा गंध उरावा !
ही ओळ खूप आवडली.

गाण्याने निःशब्दाच्या मन माझे चिंब भिजावे...
मौनाच्या संगीताचा घट एकांतात झरावा !
-मस्त.
व्वा व्वा.

छान.
आठवणींचा शेर फार आवडला.

कोणाच्या आठवणींनी डबडबती माझे डोळे... ?
आईचे दुःख दिसावे ! बापाचा त्रास स्मरावा !

जिंकावे दोघांपैकी कोणीही; हरकत नाही...
माझी अट इतकी आहे, खेळाला रंग भरावा !

मी माझ्या सोबत आहे अन् आगे-मागेसुद्धा...
मी माझी साथ करावी; मी माझा हात धरावा !

इच्छा ही एकच माझी शेवटची आहे आता...
मृत्यूने येण्याआधी माझा हा जन्म सरावा !

हे सर्व शेर आवडले.
ठळक ओळी फार आवडल्या.

धन्यवाद.

दिलखुलास प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

वाह!!!!!!!

जिंकावे दोघांपैकी कोणीही; हरकत नाही...
माझी अट इतकी आहे, खेळाला रंग भरावा !
खेळाला रंग भरावा! वा वा!

इच्छा ही एकच माझी शेवटची आहे आता...
मृत्यूने येण्याआधी माझा हा जन्म सरावा !

हे दोन शेर फारच छान.