भेटाया आल्या गझला, त्याच्या नंतर.
आला काल निरोप तिला, त्याच्या नंतर
भेटाया आल्या गझला त्याच्या नंतर
हासत गेली सारी स्वप्ने पैलतिरी
गाव दिला हा मदिरेला त्याच्या नंतर
थांब जरा होईल इशारा काळाचा
येणार्या ये उदयाला त्याच्या नंतर
झोळी भरली इतके जमले ना ना ना
शिकलो ना देणे ना ला त्याच्या नंतर
शब्दाळुंचे वारुळ पिंजुन दमलो अन
गझलाळुंनी माग दिला त्याच्या नंतर
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
गुरु, 03/06/2010 - 09:36
Permalink
अलामत! ?? गझलाळू - मस्त शब्द!
अलामत! ??
गझलाळू - मस्त शब्द!
अजय अनंत जोशी
शुक्र, 04/06/2010 - 12:29
Permalink
ह बा, जमता जमता राहिलंय असं
ह बा,
जमता जमता राहिलंय असं वाटतंय.
थांब जरा होईल इशारा काळाचा...
येणार्या, ये उदयाला त्याच्या नंतर
हा शेर मात्र छान.
ह बा
शुक्र, 04/06/2010 - 16:19
Permalink
बेफिकीरजी अजय अनंत
बेफिकीरजी
अजय अनंत जोशीजी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आत्ताच बाराखडी मधील अलामत बद्दलची माहिती वाचली तरीही कन्फ्युजन आहेच. अभ्यास चालू आहे.